मुख्य सामग्रीवर वगळा

*महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बहुजन नेते मा.संजय भैय्यासाहेब सोनवणे.यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात एकूण 10 गावांमध्ये शाखा उद्घाटन समारंभ संपन्न झाले*

 इंदापूर:-आषाढी पौर्णिमा (गुरुपौर्णिमा) चे औचित्य साधून सर्व "महापुरुषांच्या" प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून "महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष" प्रदेश कार्यालय इंदापूर या ठिकाणावरून "भव्य रॅली व शाखा उद्घाटनाच्या" कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली...

१). यामध्ये सर्वप्रथम *इंदापूर तालुक्यातील पहिली शाखा "अवसरी" या ठिकाणी संपन्न झाली.*
 
२). *"गोंदी" गाव च्या ग्रामस्थांनी व तेथील महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने मा. संजय भैय्यासाहेब सोनवणे. यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.*

3). *"लुुमेवाडी"* संपूर्ण गावांमधील मुसलमान बांधवांच्या वतीने *मा.संजय भैय्यासाहेब सोनवणे.* यांची संपूर्ण गावांमध्ये हलगी च्या नादात व फटाका फोडत भव्य मिरवणूक काढण्यात आली *"हाफिज फतेह मोहम्मद जोधपुर वाले बाबा"* यांच्या दर्ग्यावर *मा.संजय भैय्यासाहेब सोनवणे.* यांनी पुष्प फुलांची चादर अर्पण करून अभिवादन केले. शाखा उद्घाटन करण्यात आले.

४). *"गिरवी (ठोकळेवस्ती)"* जय भीम चौक येथे *डॉ.बाबासाहेब आंबेडकर.* यांच्या प्रतिमेला अभिवादन करून शाखा उद्घाटन समारंभ.

५). "लक्ष्मीनगर (नरसिंगपूर)" या ठिकाणी *महिला आघाडी* यांच्या वतीने भव्य शाखा उद्घाटन समारंभ.
६). *"नरसिंगपूर."*

७). *"टणू."*

८). *"पिंपरी बुद्रुक."*

9). *"गणेश वाडी."*

१०). *"वडापुरी" गाव भव्य शाखा व ऐतिहासिक जाहीर सभा.*

सर्व शाखा उद्घाटन समारंभ *"अबकी बार भैय्यासाहेब आमदार"* या घोषणेमध्ये सर्व शाखा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. शेवटची शाखा *वडापुरी या ठिकाणी भैय्यासाहेब सोनवणे.* यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बहुजन नेते मा.संजय भैय्यासाहेब सोनवणे. व हजारो कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी रवाना झाले. यावेळी वडापुरी शाखेच्या वतीने आलेल्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे *महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष वडापुरी शाखा यांच्यावतीने स्वागत सन्मान करण्यात आला.* त्याचबरोबर *विविध जाती-धर्माच्या युवकांना चांगल्या प्रकारचे संधी निर्माण होवी त्यांचे नेतृत्व समोर यावे यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने "(विंग्स)"* तयार करून नवीन पदाधिकारी यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली यामध्ये सर्वप्रथम 
१). *मा.रुपेश (दादा) कांबळे साहेब. यांची "महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष अहमदनगर जिल्हा" अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.*
२). *मा.राहुलजी साळुंखे साहेब. यांची "महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष प्रणित छत्रपती शंभुराजे ब्रिगेड" इंदापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.*
३). *मा.सागर जी देवकर-पाटील यांची "महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष प्रणित छत्रपती शंभुराजे ब्रिगेड" इंदापूर तालुका युवक अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.*
४). *मा.देविदासजी विलास देवकर-पाटील यांची "महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष प्रणित छत्रपती शंभुराजे ब्रिगेड" इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.*
५).*मा.अनिलजी संभाजी शिंदे साहेब यांची "महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष प्रणित छत्रपती शंभुराजे ब्रिगेड" इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.*
६). *मा.शाहिद मोहम्मद पठाण. यांची "महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष प्रणित अल्पसंख्यांक सेल" इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.*
७). *मा.विजयजी भानुदास पोळ साहेब. यांची "पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी" नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.*
८). *मा.प्रकाशजी विठ्ठल वाघमोडे साहेब. यांची "महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष प्रणित राजमाता अहिल्याबाई होळकर ब्रिगेड" इंदापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.*
९). *मा.नानासाहेब दत्तात्रय चव्हाण यांची "महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष प्रणित क्रांतिवीर उमाजी नाईक ब्रिगेड" इंदापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.*
सर्व नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले व सर्वांना पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा देण्यात आले...

*महाराष्ट्र मध्ये सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा पहिला *"रिपब्लिकन"* पक्ष म्हणजेच *"महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष"* हा आहे...

*"महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष पक्षप्रमुख बहुजन नेते मा.श्री.संजय भैय्यासाहेब सोनवणे."* यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करताना *सर्वप्रथम "गुरुपौर्णिमेनिमित्त" सर्व महापुरुषांना अभिवादन केले* व त्याचबरोबर *माझे "पहिले राजकीय गुरु पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटा चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मा.जोगेंद्र कवाडे सर"* यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या आयुष्यामध्ये सुख , शांती , आरोग्य , बल प्राप्त हो अशी प्रार्थना करण्यात आली...
अवघ्या दीड वर्षांपूर्वी आपल्या या पक्षाला म्हणजेच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली बघता-बघता एवढ्या कमी कालावधीमध्ये हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पसरला गेला. या *पक्षामध्ये सर्वात जास्त तरुण युवक मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर महिलांची सुद्धा संख्या युवकांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहे.* 

महाराष्ट्र मध्ये भरमसाठ पक्ष आहेत मग आपण आणखी एक पक्ष काढला तर आपल्याकडे कोणी काम करेल का असा प्रश्न उभा राहत असताना सर्व कमिटीचे बैठक बोलवण्यात आली त्यामध्ये जनतेच्या व युवकांच्या कोणत्या प्रश्नांवर आपला पक्ष काम करणार हे ठरवत असताना *पक्षप्रमुख मा.संजय भैय्यासाहेब सोनवणे.* यांनी सांगितले की आपण *"प्रामुख्याने जो युवक बेरोजगार आहे नोकर आहे. अशांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी व त्यांना मालक करण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष प्रयत्न करणार.* याच माध्यमातून अनेक *युवकांना स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी स्वतःचा व्यवसाय चालू करून दिले स्वतःला मालक बनवून दिले या सर्व गोष्टींमुळे इंदापूर तालुका असेल , पुणे जिल्हा , सोलापूर जिल्हा , अहमदनगर जिल्हा , बीड जिल्हा , छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)जिल्हा , ठाणे जिल्हा , सांगली जिल्हा" , या ठिकाणी तरुण मोठ्या संख्येने पक्षामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे.* 
*महाराष्ट्र मध्ये येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 288 जागा स्वबळावर लढवणार आहे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सर्व साधारण घरातल्या लोकांना आमदार करणार , खासदार करणार , सरपंच करणार , महापौर बनवणार , तरुण युवकांना घेऊन राजकारणामध्ये एक नवीन जाळे निर्माण करनार इतर पक्षांमध्ये घराणे शाही चालू आहे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख मा संजय भैय्यासाहेब सोनवणे तीच घराणे शाही मोडीत काढणार...*
*प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये जे मोठमोठे पदाधिकारी आहेत जे त्यांचे निकट आहेत. अशा लोकांना मोठं केलं जातं परंतु "महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सर्व सामान्य लोकांना व जनतेला , बेरोजगारांना , शेतकऱ्यांना मोठं करणार हा शब्द पक्षप्रमुख मा.संजय भैय्यासाहेब सोनवणे यांनी दिला..*
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची *आदर्श शाखा म्हणून इंदापूर तालुका न्हावी गाव* असे गौरवण्यात आले त्याचे कारण असे आहे की या गावां मध्ये *13 जातीच्या लोकांचा समावेश आहे. 13 जाती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात एकत्र नांदत आहे* हाच आदर्श घेऊन महाराष्ट्र मध्ये सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष काम करत आहे. *महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष अंतर्गत सर्व जातींना एकत्र बांधून ठेवण्यासाठी प्रत्येकाला योग्य तो न्याय मिळावा योग्य तो मान मिळावा यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष प्रणित जाती-धर्मांच्या WINGS तयार करण्यात आल्या.* सर्वांना सांगितले की *भविष्यामध्ये कोणाला कसले अडचण आली तर संजय सोनवणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.* लोकांकडून भैय्यासाहेबांना रात्री १ वाजता व 2 वाजता फोन येत असतात निम्म्या रात्री सुद्धा नढलेल्या जनतेसाठी सेवा करत आहेत. सर्व पदाधिकारी यांना सांगण्यात आले की *"पद घेतल्यानंतर कोणीही शांत बसता कामा नये"* अडलेल्या नडलेल्या शोषित , पीडित , गरीब , कष्टकरी , शेतकरी यांची कामे करा त्यांना मदतीचा हात द्या जे तुम्हाला शक्य आहे तेवढे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा जे तुमच्याकडून होणार नाही ते मला सांगा असेही त्यांनी सांगितले या *पक्षांमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यापासून कार्यकर्त्यापर्यंत भैय्यासाहेबांची बारीक लक्ष आहे.* यामध्ये कार्यकर्त्यांना काय हवं आहे काय नाही त्याच्या घरामध्ये काय चाललं आहे या सर्व गोष्टी भय्यांपर्यंत पोचतात *"आज पर्यंत भैय्यासाहेबांनी जेवढे कार्यकर्त्यांना मदत केली व स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी प्रयत्न केला तेवढ्या सगळ्यांना नमकता सर्व काही गोष्टी दिल्या आहेत..."*
इतर राजकीय पक्षांमध्ये नेत्याचा डावा हात , नेत्याचा उजव्या हात , नेत्याच्या हा जवळचा , नेत्याच्या तो जवळचा , नेत्याचा हा लांबचा , नेत्याचा तो लांबचा , अशी परिस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. परंतु *महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये भैय्यासाहेब यांच्या जवळचा असा कोणताच व्यक्ती नाही की हा उजवा , डावा , मधला , जवळचा , लांबचा , "इथे गाडीत फिरणाऱ्या पासून ते सभेमध्ये शेवटच्या खुर्चीवर बसणाऱ्या पर्यंत सर्वजण भैय्यासाहेबांच्या जवळ" आहेत.* सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे काम "महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मा.संजय भैय्यासाहेब सोनवणे." हे करत आहेत. आणि आपण सर्वांनी अशा पद्धतीचे काम केलं पाहिजे म्हणूनच आपल्याला या दीड वर्षाच्या पक्षांमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढ होताना दिसत आहे....
इंदापूर तालुक्यावर बोलताना भैय्यासाहेबांनी सांगितले की *"इंदापूर तालुक्यातील जो २२ गावाच्या पाणी प्रश्न होता. उजनी धरणाच्या गेटवर भैय्यासाहेबांनी ज्यावेळी आंदोलन धरले होते. त्यावेळी पत्राद्वारे समजले की राज्य सरकारने "5TMC पाणी रद्द करण्याचा (GR) काढण्यात आला आहे" 22 गावांच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी त्या शासनाच्या आदेशाची होळी केली.* व त्या सर्व गोष्टी NEWS च्या माध्यमातून छापल्या गेल्या लोकांपर्यंत पोहोचल्या *"शासनाच्या आदेशाचा" निषेध म्हणून "पुणे-सोलापूर हायवे" बंद करण्यात आला.* 

आपण वेगवेगळी आंदोलन केली त्यामध्ये *"टोल नाक्यावर लोकल गावांना फ्री पास मिळण्यासाठी आंदोलन केलाय"* या *"आंदोलनामुळे इंदापूर तालुका , करमाळा तालुका , माढा तालुका पैकी 98 गावांना फायदा झाला."* टोल कंपन्यांनी मिळून *"पुणे SP अधिकारी पासून ते कलेक्टर" पर्यंत षडयंत्र रचण्यात आले "पोलिसांचा फौज फाटा भैय्यासाहेब सोनवणे." यांच्या घराच्या बाहेर छावणीच्या स्वरूपात लावण्यात आला काही पैसे घेऊन संजय सोनवणे. गप्प बसतो की काय हा सुद्धा प्रयत्न करण्यात आला परंतु "भैय्यासाहेब सोनवणे हे कोणत्याही आमिषाला बळी पडले नाही" सर्व अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की जोपर्यंत या "98 गावांना लोकल पास" मिळत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही.*

*सरडेवाडी टोल नाक्यावर जे चहाच्या टपरी आहेत त्या टपऱ्या काही लोकल पुढार्‍यांच्या सांगण्यावरून काढण्यात आल्या* चहावाल्या सर्वांनी भैय्यासाहेब सोनवणे. यांची भेट घेऊन झालेला सर्व प्रकार सांगितला की आम्ही चहा विकून रोजचे १०० रू ते २०० रु कमवत आहे ते सुद्धा हे टोलवाले बंद करून पाहत आहेत. *"भैय्यासाहेब सोनवणे. यांनी सांगितले की तुम्ही सर्वांनी फक्त ठाम राहा "मी तुमची चहाची टपरी एक इंच सुद्धा हलू देणार नाही"* पोलीस लावून त्या टपऱ्या हटवण्याचा प्रयत्न केला पण *भैय्यासाहेबांनी समोर येऊन त्या सर्व गोष्टीचा विरोध केला. आज एकही चहाची टपरी एक इंच सुद्धा हलवू दिली नाही व सर्व चहा टपरी चालक आज घरी जाताना रोजचे १०० रु , २०० रू , ५०० रू. असे पैसे घरी घेऊन जात आहेत.* ही कामे *छोटी-मोठी जरी असली तरी ते एखाद्याचं घर परपंच्या चालत आहे. अशा गरीब लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे महत्त्वाचं आहे.* 

*भैय्यासाहेब सोनवणे. यांच्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीने कधी मागे सरले नाही* आज *इंदापूर तालुक्यातील शाखा उद्घाटन प्रसंगी "गिरवी (ठोकळे वस्ती)" या ठिकाणी गेले असता दोन पक्षांच्या पदाधिकारी यांच्या विरोधामध्ये ठोकळे वस्ती कडे जाणारा रस्ता हा आजपर्यंत दुरुस्त झाला नाही भैय्यासाहेब सोनवणे. हे प्रशासनाशी बोलून बघणार आहे की या दोन गटाच्या भांडणांमध्ये गरीब जनते वर अन्याय का होत आहे. रस्ता का होत नाही लवकरात लवकर रस्ता न झाल्यास तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संस्थापक अध्यक्ष संजय भैय्यासाहेब सोनवणे. या विषयांवर आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही.* व असा अन्याय जनतेवर झालेला आम्ही कदापि सहन करणार नाही.. 
*इंदापूर तालुक्यामध्ये काही ठिकाणी जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे. हे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष कधीही खपवून घेणार नाही अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष तीव्र आंदोलन करेल...*

*इंदापूर तालुक्यामध्ये लोणी देवकर या ठिकाणी MIDC आहे. या कंपनीमध्ये परराज्यातून कमी पैशात काम करणाऱ्या लोकांना आणून ठेवले आहे. आणि तालुक्यातील लोकांना कंपनीमध्ये घेतले जात नाही मग असा असताना या लोकांनी कोणाकडे जायचे यासाठीही MIDC विरोधात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष मोठा निर्णय घेणार.* 

*चळवळीमध्ये काम करत असणाऱ्या माझ्याशी सेवा करत असताना घराकडे लक्ष दिले नाही म्हणून नेत्यांची आजची भयानक परिस्थिती आहे. त्यांच्या घरामध्ये खाण्यासाठी अन्न नाही , राहण्यासाठी घर नाही , समाजाची सेवा करणाऱ्याच्या घरामध्ये आज चुल पेटत नाही.* त्यामुळे *महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगत आहे. की आपण आपले घर परपंचा बघा पक्षासाठी जास्तीचा वेळ देण्याची काही गरज नाही. दिवसातून दोन तास पक्षाचे काम करा.
भिगवन परिसरामध्ये अनेक ठिकाणी MIDC होत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यामध्ये लक्ष घालणार व तालुक्यातील युवकांना रोजगार देणार भैय्यासाहेब सोनवणे यांनी ही जबाबदारी कामगार नेते पुणे जिल्हा अध्यक्ष मा.अभिजीत भैय्या गायकवाड साहेब. यांच्यावर ही जबाबदारी दिले आहे.* यामध्ये किती लोक आपले आहेत. व किती परराष्ट्रात बाहेरचे आहेत. आणि या कंपन्यांना जाब विचारण्याचे गरज आहे. *आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी दिलेल्या जमिनीवर या मोठमोठ्या MIDC उभा आहेत. आणि याच MIDC मध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी भेटत नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे हे या इंदापूर तालुक्यात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष कधीही खपवून घेणार नाही काहीही झाले तरी भैय्यासाहेब सोनवणे जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि सर्वां च्या हाताला काम दिल्याशिवाय महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष गप्प बसणार नाही. कोणताही विषय हाताळता येत नसेल तर तात्काळ आंदोलनाचा इशारा द्या..*
आज तालुक्यामध्ये एवढी भयानक परिस्थिती चालू आहे. की आज सगळ्यांना घरकुला आलेले आहेत. पण त्यांच्या नावे जागा नाही. 1951 ते 1952 साली महसूल विभागाने दिलेल्या जमिनी त्या सुद्धा बळकावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. जशास तसे उत्तर दिले पाहिजे ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार होईल त्या-त्या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी ताकद लावा , मदत करा ज्या गोष्टी तुमच्याकडून होणार आहेत. त्या करा ज्या तुमच्याकडून होणार नाहीत त्या मला म्हणजे संजय सोनवणे. यांना सांगा *हातामध्ये दांडा घेऊन प्रशासनाला जाब विचारण्याची ताकद आहे.* आपण *"चोऱ्यामाऱ्या करणारे किंवा दलाली करणारे कार्यकर्ते नाही तर अन्यायग्रस्तांना मदत करणारे समाजसेवक आहोत."*
"अवसरी"* गाव या ठिकाणी *लोक राहत असलेल्या वस्ती हटवून गायरान जमिनी लोक करत आहेत. त्या हटवून काही लोक सौर ऊर्जा चा प्लांट उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत.* हे सांगण्यासाठी काही लोक भैय्यासाहेबांना भेटत आहेत त्यांना *भैय्यासाहेबांनी शब्द दिला आहे की तुम्ही निश्चिंत रहा कोण सौर ऊर्जा प्लांट उभा करते ते बघू मी त्या लोकांच्या व गावकऱ्यांच्या मध्ये संजय भैय्यासाहेब सोनवणे उभा आहे.* 
एवढे बोलून *"गाव तिथे शाखा , शाखा तिथे न्याय , समता , बंधुता"* या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा , तालुका , गाव , वाडी-वस्ती कुटुंब प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल याची काळजी पक्षातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घ्यावी अशी विनंती करण्यात आले यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...