इंदापुर शहरात दुचाकीवर तीनजण बसवून, पुंगळ्याकाढून गाड्या पळवतात सुसाट तर निवडणूकपूर्वीच सगळ्यांचीच लागली वाट,
इंदापुर:-
सध्या दहावी बारावीचा परीक्षेचा सीजन चालू असताना सर्वत्र रस्त्यावर गर्दी आणि रेलचल पाहायला मिळत आहे इंदापूर बस स्टॅन्ड ते कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय इंदापूर या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक व अबालवृद्धांची रेलचेल असते परंतु पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग यावर कॉलेजच्या समोर एकही पोलीस फिरताना दिसत नाही ट्राफिक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे सध्या दुचाकी वर लहान लहान अल्पवयीन मुलं तीन तीन चार चार बसून गाडीच्या पुंगळ्या काढून,पळवताना दिसतात, बुलेट मोठ्या आवाजात,फटका मारत रस्त्याने सुसाट जाताना पाहायला मिळत आहे परंतु याकडे कोणाचे लक्ष राहिलेले नाही यावर ट्राफिक पोलीस कारवाई करतील काय असा जनसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.
टिप्पण्या