खा. सुप्रियाताई सुळे यांचे विश्वासू व उप-मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खंदे समर्थक, गोरगरीब जनतेचे कैवारी व राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका माजी अध्यक्ष महारूद्र पाटील यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा
इंदापूर :- खा. सुप्रियाताई सुळे यांचे विश्वासू व उप-मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खंदे समर्थक, गोरगरीब जनतेचे कैवारी व राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका मा.अध्यक्ष महारूद्र पाटील यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला,यावेळी सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल राव आप्पा ननवरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे बाळासाहेब व्यवहारे, राजेंद्र चौगुले यांचाही वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस वसंतराव आरडे, जिल्हा परिषद माजी सदस्य अमोल शेठ भिसे, सामाजिक कार्कर्ते व मा. नगरसेवक मा.दादासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सचिनशेठ चव्हाण, लक्ष्मण देवकाते, किसनराव जावळे, उपस्थित होते हा कार्यक्रम महारुद्र पाटील यांच्या कार्यालयात संपन्न झाला यावेळी महारुद्र पाटील म्हणाले की आमच्या सर्वांना आपण भरभरून प्रेम रुपी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत,महारुद्र पाटील यांचे वर महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
टिप्पण्या