मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

गुंडगिरी ची भाषा बंद करा, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात याचंही भान ठेवावे-अॅड शरद जामदार


इंदापूर:- तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिक संतुलन बिघडले ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काल जो हल्ला झाला या पार्श्वभूमीवर इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजपचा कार्यकर्ता बद्दल जे वक्तव्य केले याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी म्हटले.
शरद जामदार म्हणाले की,' भाजपा बद्दल जी बदनामी केली जात आहे ती कदापि सहन केली जाणार नाही. भारतात लोकशाही असून मोगलाई नाही त्यामुळे रस्त्यावर फिरु देणार नाही अशी भाषा कोणी वापरू नये. एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक दिवस आंदोलन चालू होते त्याच्या उद्रेकातून काल ही घटना घडली. सदरची घटना निंदनीय व महाराष्ट्रच्या संस्कृतीला अशोभनीय आहे सदर घटनेचा आम्ही निषेध करतो.
भाजप पक्षाचे कार्यकर्ते संस्कारक्षम, सक्षम, आणि प्रामाणिक असून जर चुकीच्या पद्धतीने कोणी अंगावर आले तर शिंगावर सुद्धा आम्ही घेऊ हेही लक्षात घ्यावे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात याचंही भान ठेवावे, ज्यांचे स्वतःचे घर काचेचे आहे त्यांनी दुसऱ्याचा घरावर दगड मारण्याचे स्वप्नातही पाहू नये.
राज्यात गृहखाते त्यांचा पक्षाचे आहे हल्ला घडेपर्यंत पोलिस यंत्रणा व गुप्तचर यंत्रणा काय करत होती. अशा घटना का घडतात का उद्रेक होत आहे. शेतकरी का रस्तावर उतरत आहे यास महाविकास आघाडीचे अपयशी सरकार जबाबदार आहे.
सत्यता पडताळून न पाहता बेछूट आरोप करणे थांबवावे. महाविकास आघाडीवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे..

चौकट........
तुमच्यातील मारामारी आगोदर मिटवा मग भाजपा वर टिका करा..इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात जर सत्य बोलणा-याचा आवाज दाबला जात असेल,,, गप्प बसण्यासाठी तालुका अध्यक्ष,जर पुणे जिल्हा सरचिटणीस यांना  दाबण्याचा प्रयत्न करत आसेल तर सामान्य जनतेचे काय? चार माणसात तमाशा करत आसेल त्यांनी आमच्याशी गुंड गिरीची भाषा करू नये, भाजप वर आरोप करण्या आगोदर तुमच्यात मेळ आहे का ते तपासून पहा, भाजप हा संस्कारक्षम पक्ष आहे, तुमच्या सारख्या हाणामा-या आम्ही करत नाही.आसेही शरद जामदार म्हणाले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...