इंदापूर तालुक्यातील सरडेवाडीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती निम्मीत त्यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पन करुन साजरी करण्यात आली सरपंच ग्रामपंचायत सरडेवाडी सिताराम तात्या जानकर उप सरपंच सतिष आबा चित्राव ग्रामपंचायत सदस्य हनुमंत जमदाडे महाविर सरडे आसिफ भाई शेख प्रशांत उत्तेकर नागनाथ शिताफ व ग्रामस्थ उपस्थित होते या वेळी बोलताना सरपंच सिताराम जानकर म्हणाले की, बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.आसे मत व्यक्त केले, या वेळी बोलताना उपसरपंच सतीश चित्राव म्हणाले की, ज्योतीबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

टिप्पण्या