मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर - दत्तात्रय भरणे
इंदापूर:-डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर करणार,विश्वरत्न,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील जयंती कार्यक्रमाप्रसंगी राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची उपस्थितांना दिली जाहिर ग्वाही.........
               ना. श्री.दत्तात्रय (मामा)भरणे  यांच्या प्रयत्नांतून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधिल विविध विकासकामांकरीता ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर झाल्याने वालचंदनगर परिसरातील नागरिकांनी मानले नामदार श्री भरणे मामा यांचे जाहीर आभार*
                  विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेस राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा)भरणे यांनी पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करून उपस्थित आंबेडकरप्रेमी जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नामदार श्री दत्तात्रय (मामा)भरणे यांनी माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याच्या राजकीय, सामाजिक जीवनात नेहमीच वालचंदनगरवासीय व येथील आंबेडकरप्रेमी जनता सदैव पाठीशी खंबीरपणे उभी रहात आल्याने माझ्यासारख्याला विविध पदे भुषवता आली व सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे सांगून देशभरासह जगातील कोट्यावधी जनतेचे श्रध्दास्थान व प्रेरणास्थान असलेले विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य जागा उपलब्ध असणारे वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे इंदापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण असून अशा सुंदर उद्यानाच्या सुशोभीकरण व विकासाकरीता तातडीने १० कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार करून तो तत्परतेने मंजूर करणार असल्याची जाहिर ग्वाही नामदार श्री भरणे मामा यांनी उपस्थितांना दिली.तसेच १० कोटी रूपयांच्या विकासकामांवर स्वतः लक्ष देऊन उद्यानातील विकासकामे दर्जेदार होण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचेही यावेळी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नामदार श्री भरणे मामा यांच्या घोषणेला प्रतिसाद दिला.
              या कार्यक्रमाच्या प्रसंगी नामदार श्री भरणे मामा यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधिल विविध विकासकामांकरीता ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर झाल्याचे सांगून सदर कामांना येत्या काही दिवसांत सुरवात होणार असल्याची माहिती नामदार श्री भरणे मामा यांनी दिली.वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधिल विविध विकासकामांकरीता भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी नामदार श्री भरणे मामा यांचे जाहीर आभार मानले.यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचे एम डी ॲन्ड सीईओ श्री चिरागशेठ दोशी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री प्रदीपदादा गारटकर, पुणे जिल्हा परिषद सदस्य श्री प्रतापराव पाटील,फॅक्टरी मॅनेजर श्री धिरज केसकर,वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लातुरे साहेब, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री सचिन सपकळ, इंदापूर तालूका संजय गांधी निराधार समितीचे  अध्यक्ष श्री सागर मिसाळ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री शुभम निंबाळकर यांच्यासह वालचंदनगर परिसरातील आंबेडकरप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...