इंदापूर:- 24 मार्च 2019 ला वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात नवा पर्याय बहुजनांना समोर उभा केला. प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधात रान उठवून तिला खिळ खिळे करण्याचे काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आज इंदापूर येथे पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा सचिव आयु.हनुमंत तात्या कांबळे,माढा लोकसभेचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, इंदापूर तालुका अध्यक्ष सागर गायकवाड, नूतन महिला अध्यक्ष मनिषा ताई चंदनशिवे, तालुका संपर्क प्रमुख सिद्धार्थ साळवे, तालुका उपाध्यक्ष हनुमंत बनसोडे, तालुका संघटक पंकज बनसोडे, तालुका सचिव प्रसाद लोखंडे, इंदापूर शहराध्यक्ष अविनाश मखरे, समाधान चव्हाण, अविनाश रणदिवे व प्रमोद भाऊ चव्हाण हे उपस्थित होते.
टिप्पण्या