भावी नगरसेवक वसीमभाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली प्लस पोलिओ मोहीमेचे आयोजन...
इंदापूर :-शहरातील व्यंकटेश नगर प्रभाग क्र. ५ मध्ये सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहरातील सर्वाधिक प्लस पोलिओ मोहिमेचे लसीकरण लहान बालकांना करण्यात आले.वसीमभाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली व्यंकटेशनगर, राजवलीनगर, शाहूनगर, अनपट वस्ती, सातपुते वस्ती, बाब्रस मळा येथील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण मोहिमेचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामध्ये जवळपास २०० बालकांना प्लस पोलिओ लसीकरण करण्यात आले.
यावेळी वसीमभाई बागवान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिओ लसीकरण झाल्यानंतर बालकांना बिस्किट पुड्यांचे खाऊ वाटप केले.
यासाठी मदतनीस सेविका चारुशीला पेटकर, बानू माने, प्रीती आरडे यांनी लसीकरण वेळी मौलाचे सहकार्य केले.
यावेळी साजन ढावरे, जगदीश मोहिते, गणेश पवार, हायुल बागवान, ऋषिकेश ऊतेकर, आझाद तांबोळी, हनुमंत माने, अमीर पठाण, अरबाज बागवान, सोहम मोहिते, हबीब बागवान, अशोक ऊतेकर, विजय मोरे, इक्बाल सय्यद आदी उपस्थित होते.
टिप्पण्या