इंदापुर:पुणे जिल्हा (ग्रामीण) भाजपाची कार्यकारिणी, बावधन,तालुका मुळशी याठिकाणी जाहीर करण्यात आली. प्रमुख कार्यकारीणी, मोर्चा अध्यक्ष व सरचिटणीस तसेच आघाड्यांचे संयोजक व सहसंयोजक, जिल्हा कार्यकारणी सदस्य,विशेष निमंत्रित इत्यादी नियुक्तीपत्र देण्यात आली.याप्रसंगी पुण्यनगरीचे खासदार माजी पालकमंत्री माननीय गिरीश बापट साहेब,माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे,आमदार राहुलदादा कुल,आमदार भीमरावअण्णा तापकीर,जिल्हाध्यक्ष गणेशजी भेगडे,माजी आमदार शरदभाऊ ढमाले,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे, जिल्ह्याचे प्रभारी योगेशजी गोगावले,पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवीजी अनासपुरे इत्यादी उपस्थित होते.या कार्यक्रमात सोशल डिस्टिंग अंतर पाळले गेले,तसेच मास्क, सॅनिटायझर इत्यादींचा वापर करण्यात आला.
ईक्साँन संस्थेचा इंदापुर अध्यक्ष म्हणून काम करणारे हर्षवर्धन कांबळे,
भारतीय जनता पार्टिने बुथ प्रमुख म्हणून काम करणेची जबाबदारी दिली ती निष्ठेने पार पाडली त्यानंतर इंदापुर शहर साेशल मिडिया अध्यक्ष, इंदापुर तालुका साेशल मिडिया अध्यक्ष पदावर नियुक्ती त्यानंतर उत्कृष्ट कामगीरी बद्दल कांबळे यांना सन्मानीत केले आणि जिल्हा सदस्य म्हणुन नियुक्त केले...
कांबळे सारख्या सामान्य कार्यकर्तेची दखल घेऊन पार्टिने त्यांच्या कार्याला न्याय दिला,हर्षवर्धन कांबळे यांना भेटलो आसता ते म्हणाले की
ऐथुन पुढे असेच भारतीय जनता पार्टिचे काम निस्वार्थी कार्यकर्ता म्हणुन करेण व सामाजीक क्षेत्रामध्ये सतत कार्यकर राहणार आसल्याचे त्यांनी सांगितले,
टिप्पण्या