इंदापूर येथील भिमाई आश्रमशाळेत ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळा,मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांच्या हस्ते ध्वजपूजन तर प्राथमिक आश्रमशाळेचे ज्येष्ठ कर्मचारी प्रकाश श्रीराम बोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सुरुवात झाली. ध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, संविधान वाचन,संगीत कवायत,प्रेरणादायी भाषणं व संगीत खुर्ची खेळाच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम, एकता आणि संविधानाचे महत्त्व अधोरेखित झाले. संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भारतीय संविधानातील मूल्ये अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी), उपाध्यक्ष तानाज...
इंदापूर ( जिल्हा पुणे ) येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राधिका शहा यांचे निधन होण्यापूर्वी त्यांच्या इच्छेनुसार पती डॉ. संदेश शहा व शहा परिवाराने अवयवदान केल्याने सहा जणांना जीवदान मिळाले. आपले दुःख बाजूस ठेवून दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा सासर व माहेरच्या शहा परिवाराचा उपक्रम आदर्श व अनुकरणीय आहे असे प्रतिपादन वालचंदनगर येथील सन्मती मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. विकास शहा यांनी केले. वालचंदनगर सन्मती मंडळाच्या वतीने डॉ. राधिका शहा यांच्या मरणोत्तर अवयवदाना बद्दल त्यांचे पती डॉ. संदेश शहा, मोठे दीर, जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शहा यांच्याकडे सन्मान पत्र देऊन शहा परिवाराचा गौरव करण्यात आला. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सशांत गांधी, युवा अध्यक्ष डॉ. चिराग गांधी, महिला अध्यक्ष डॉ. निकिता दोभाडा, सचिव सारिका गांधी, महाराष्ट्र राज्य नोटरी प्रॅक्टिशनर असोसिएशन चे नूतन तालुकाध्यक्ष ॲड वैभव गांधी, सौ. संगीता श्रेणिक शहा उपस्थित होते. डॉ. विकास शहा पुढे म्हणाले, मरणोत्तर अवयवदान हे मानव जातीसाठी सर्वश्रेष्ठ दान आहे. तो सामाजिक बांधिलकीचा आदर्श वस्त...