इंदापूर: येथील श्री. रनछोडदास कल्याण शहा विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन आणि वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गिरीश शहा यांच्या प्ररणेने आणि मार्गदर्शनाखाली या संयुक्त उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना योग शिक्षिका सौ. सायराभाभी हमीद आत्तार, योग शिक्षक श्री. चंद्रकांत देवकर, अशोक अनपट आणि देवराव मते यांनी योगासनांचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांकडून विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करून घेण्यात आली. "रोजच्या धावपळीच्या जीवनात योगाचा समावेश केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे उत्तम राहते," याबद्दल मार्गदर्शकांनी मोलाचा सल्ला दिला. योग साधना झाल्यानंतर शालेय परिसरात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत भव्य वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गिरीश शहा, वृक्ष संजिवनी परिवाराचे सायरा आत्तार, श्री. चंद्रकांत देवकर , श्री. अशोक अनपट आणि श्री. हमीदभाई आत्तार तसेच विद्यार्थ्यांच्या...
SHIVSRUSTHI NEWS