महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था; शिस्तबद्ध आणि आदर्श आयोजनाने इंदापूरकर भारावले इंदापूर शहराने शुक्रवारी एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळा अनुभवला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रथमच इंदापूरमध्ये सांस्कृतिक गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “शिवशंभो गर्जना” या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले. इतिहास, संस्कृती, पराक्रम आणि शिवभक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण इंदापूर शहर शिवमय झाले होते. प्रशांतमामा उंबरे युवा मंच, इंदापूर यांच्या वतीने इंदापूर नगरपालिकेसमोरील विस्तीर्ण परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रभर गाजलेला “ABHI - AAMU LIVE FOLK MUSICAL” हा सांस्कृतिक कार्यक्रम पहिल्यांदाच इंदापूरकरांच्या भेटीला आला होता. त्यामुळे कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. सायंकाळपासूनच कार्यक्रमस्थळी नागरिकांची गर्दी उसळू लागली होती. या कार्यक्रमाला इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरतभाऊ शहा, शहा स्कूलचे विश्वस्त मुकुंदभाऊ शहा, माजी ...
SHIVSRUSTHI NEWS