माढा/टेंभुर्णी: एकीकडे इस्रो चंद्रावर पाऊल ठेवत असताना, दुसरीकडे सोलापूरच्या माढ्यात मात्र काही लोक अजूनही 'कासवाच्या पाठीवर' बसून श्रीमंतीच्या स्वप्नांची सफर करत आहेत. मनोहर मामाच्या 'प्रसादानंतर' आता माढ्यात **नाना महाराज उर्फ गुरुमाऊली वीरकर** या दुसऱ्या महाठगाचा 'मोक्ष' झाला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी भल्या पहाटे या 'माऊलीं'ना साखरझोपेतून उचलले आणि थेट कोठडीची हवा दाखवली. ' कासव' नेले अन नशीब फुटले!** एका पीडित तरुणाला या बाबाने चक्क पैशांच्या पावसाचे' स्वप्न दाखवले होते. "माझं हे खास कासव घरी ने, मग बघ तुझ्यावर लक्ष्मी कशी प्रसन्न होते," अशी थाप मारून बाबाने त्या तरुणाकडून तब्बल ५ लाख रुपये उकळले. नशीब तर चमकले नाहीच, पण कासवाच्या नादात तरुणाचा खिसा मात्र 'कासवाच्या गतीने' रिकामा झाला आणि कर्जाचा डोंगर मात्र 'बिबट्याच्या वेगाने' वाढला! पहाटेचा थरार: पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक ' अनेक राजकीय नेत्यांचे वरदहस्त असल्याने हे बाबा हवेत तरंगत होते. पण, आज पहाटे टेंभुर्णी पोलिसांनी असा काही 'चमत...
SHIVSRUSTHI NEWS