मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील )डोंबिवलीमध्ये लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल डोंबिवली स्थानकात रिकाम्या लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल झाले असून कल्याण ते सीएसएमटी एसी लोकलवरही टांगती तलवार ठाणे: मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल सेवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सोमवारी विस्कळीत झाली आहे. डोंबिवली स्थानकात लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. विशेषतः कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली असून, कामावर निघण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कालही फलाट बंद होते कोपर आणि ठाकुर्ली स्थानकातील धीम्या मार्गावरील वाहतूक रविवारी फलाट रुंदीकरणासाठी बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले असताना आठवड्याचा पहिलाच दिवस रेल्वे प्रवाशासाठी डोकेदुखीचा ठरला. सकाळी ८.३० वाजताची कल्याणच्या दिश...
SHIVSRUSTHI NEWS