उजनी धरणग्रस्त शेतक-यांच्या अतिक्रमण हटाव नोटीस तात्काळ रद्द कराव्यात या मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व कृषी मंत्री मा. दत्तात्रय भरणे (मामा) यांनी दिले.
उजनी धरणग्रस्त शेतक-यांना भिमा उपसा सिंचन विभागामार्फत पाठवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटीस तात्काळ रद्द कराव्यात या मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व कृषी मंत्री मा. दत्तात्रय भरणे (मामा) यांनी दिले. इंदापूर मतदारसंघातील व परिसरातील उजनी धरणग्रस्त शेतक-यांना भिमा उपसा सिंचन विभागामार्फत पाठवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटीस तात्काळ रद्द कराव्यात या मागणीचे निवेदन राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व कृषी मंत्री मा. दत्तात्रय भरणे (मामा) यांनी भेटून दिले. वास्तविक पाहता उजनी धरणाच्या निर्मितीसाठी इंदापूर, करमाळा, माढा, दौंड, कर्जत तालुक्यातील ८१ गावांनी त्याग केलेला आहे या गावातील शेतक-यांनी सर्वस्वी त्याग केलेला आहे. नाममात्र किंमतीमध्ये शासनाने हजारो शेतक-यांची मालमत्ता संपादित केलीली आहे. मात्र हा त्याग जनहितासाठी केलेला आहे. या धरणग्रस्तांचे अदयाप योग्य पुनर्वसन देखील झालेले नाही. अनेक उजनी धरणग्रस्त शेतकरी गावे, नागरी सुविधा पासून वंचि...