संत गाडगेबाबा जयंती निमित्त इंदापूरमध्ये स्वच्छता मोहिम इंदापूर, दि. २३ फेब्रुवारी २०२६ : इंदापूर नगरपरिषदेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून शहरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. आज सकाळी ७.३० वाजता सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सदर मोहिमेस मा. नगराध्यक्ष श्री. भरत शेठ शहा, मा. उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब ढवळे-पवार, नगरपरिषदेचे मा. पदाधिकारी तसेच मा. मुख्याधिकारी श्री. रमेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या वेळी बोलताना नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा म्हणाले की संत गाडगे वावा स्वच्छतेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज यांची आज जयंती. माणसातच देव आहे असे सांगणारे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले , व स्वच्छता मोहिमेची सुरुवात श्रीराम चौक येथून करण्यात आली. यावेळी शंभर फूटी रोड येथील संत गाडगेबाबा यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची...
SHIVSRUSTHI NEWS