इंदापूर ( जिल्हा पुणे ) येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राधिका शहा यांचे निधन होण्यापूर्वी त्यांच्या इच्छेनुसार पती डॉ. संदेश शहा व शहा परिवाराने अवयवदान केल्याने सहा जणांना जीवदान मिळाले. आपले दुःख बाजूस ठेवून दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा सासर व माहेरच्या शहा परिवाराचा उपक्रम आदर्श व अनुकरणीय आहे असे प्रतिपादन वालचंदनगर येथील सन्मती मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. विकास शहा यांनी केले. वालचंदनगर सन्मती मंडळाच्या वतीने डॉ. राधिका शहा यांच्या मरणोत्तर अवयवदाना बद्दल त्यांचे पती डॉ. संदेश शहा, मोठे दीर, जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शहा यांच्याकडे सन्मान पत्र देऊन शहा परिवाराचा गौरव करण्यात आला. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सशांत गांधी, युवा अध्यक्ष डॉ. चिराग गांधी, महिला अध्यक्ष डॉ. निकिता दोभाडा, सचिव सारिका गांधी, महाराष्ट्र राज्य नोटरी प्रॅक्टिशनर असोसिएशन चे नूतन तालुकाध्यक्ष ॲड वैभव गांधी, सौ. संगीता श्रेणिक शहा उपस्थित होते. डॉ. विकास शहा पुढे म्हणाले, मरणोत्तर अवयवदान हे मानव जातीसाठी सर्वश्रेष्ठ दान आहे. तो सामाजिक बांधिलकीचा आदर्श वस्त...
SHIVSRUSTHI NEWS