मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सुकलवाडीत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

वाल्हे प्रतिनिधी -सिकंदर नदाफ विकास कामांच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असलेल्या पुरंदर तालुक्यातील सुकलवाडीत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली भोसले तसेच रणगडे परिवाराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला माजी जिल्हाधिकारी शिवलिंग गणपत भोसले यांच्या स्मरणार्थ भोसले परिवाराच्या वतीने १५ गुंठे जागा बक्षिसपत्र स्वरूपात देण्यात आली होती. त्या जागेवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन प्रताप भोसले कमल भोसले सुवर्णा राणगडे निखिल राणगडे आदींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र निगडे यांसह विराज काकडे वामनराव जगताप माजी सरपंच दत्तात्रय पवार तसेच मोहन पवार सुनील पवार अमोल खवले महादेव चव्हाण सतीश सूर्यवंशी मोहन जगताप संतोष निगडे नितीन गावडे रणसिंग पवार अमित पवार उर्मिला पवार वैजंता दाते अश्विनी चव्हाण तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र चिकणी यांसह साईनाथ चव्हाण संध्या पवार आदी मान्यवर उपस्थित ह...

हर्षवर्धन पाटील यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद दौरा

इंदापूर : प्रतिनिधी दि.20/10/25                               राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कंदर (ता. करमाळा) व शिराळा (ता. माढा) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद दौरा रविवारी (दि.19) संपन्न झाला. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.            निरा भिमा कारखान्याचा आगामी सन 2025-26 चा गळीत हंगाम 25 वा म्हणजे रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम आहे. या गळीत हंगामासाठी कारखान्याची दररोज 6500 मे. टन ऊस तोडणी वाहतूकीची यंत्रणा सज्ज झाली आहे. सहकारी संस्थाचा शेतकऱ्यांना नेहमीच आधार वाटला आहे. त्यामुळे सहकारी कारखानदारी महत्वाची आहे. तसेच शेतकऱ्यांना इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक शाश्वत वाटत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.         नीरा भीमा कारखान्याने गेली 25 वर्षांचा इतिहास काढून पहा नेहमीच चांगला दर दिलेला आहे. दराच्या बाबतीत क...

सरडेवाडी गाव दिपावलीच्या पुर्व संध्येला निघाले उजळून.

 इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गाव दिपावलीच्या पुर्व संध्येला निघाले उजळून,सरडेवाडी गावच्या सरपंच सुप्रियाताई माने - कोळेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक वैभव जाधवर यांच्या पुढाकाराने सरडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाडी वस्ती वर प्लड लाईट बसवण्यात आले. त्यामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.गावातील तळागाळातील लोकांपर्यंत प्रत्येक योजना. पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहील.  असे सरपंच सुप्रियाताई माने -कोळेकर यांनी सांगितले. सर्व ग्रामस्थ माता भगिनी यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

या स्वार्थी दुनियेत अजुनही माणुसकी जिवंत.हरवलेले पैसे, परत..!

 इंदापूर:- हरवलेले पैसे, मोबाईल,सोने, बँग, कागदपत्रे, शक्यतो परत मिळत नाहीत.पण ते परत मिळाले तर माणुसकीचे एक उत्तम उदाहरण आहे व या जगात अजुनही प्रमाणिक लोक आहेत.अशीच एक घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्यांचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख  यांच्या मौजे बाभळगाव ता. जि. लातूर येथे दिनांक.16 / 10 /2025 रोजी दुपारी 2. वाजता प्रथमेश टि हाऊस चे मालक श्री शैलेश (शालिक) नाडागुडे हे घराकडे जात असताना त्यांना त्यांच्या समोर रोडवर एक पाकीट दिसले व त्यामध्ये पाहिलं असता रोख रक्कम 5000/-हजार रुपये व एक व्यक्ती,एक महिला,दोन लहान मुलांचे मुळ आधार कार्ड, आभा कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स व इतर ओरिजनल कागदपत्रे असलेले पाकिट त्यांना सापडले.त्या मध्ये कोणाचाही मोबाईल नंबर नसल्याने कोणालाही फोन पण लावता येत नव्हता. व आधार कार्ड वरील पत्ता पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील असल्यामुळे काही संपर्क साधता येत नव्हता त्यामुळे बराच वेळ त्या ठिकाणी थांबले मागे किंवा पुढे कोणी गेले असेल त्याचे असावे परत कोणीतरी येईल असं त्यांना वाटले.बराच वेळ वाट पाहूनही कोण...

सरडेवाडीत वंदन फर्निचर शोरुमचे भव्य ग्रेड ओपनिंग,

इंदापूर सरडेवाडी टोल नाका शेजारी अथर्व लॉन्स येथे वंदन फर्निचर शोरुमचे भव्य ग्रेड ओपनिंग निमित्त लाडक्या वहिनींन साठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सिनेअभिनेते राहुल पद्मीनी नवनाथ राजे हे सादर करणार आहेत.  वार शनिवार १८/१०/२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता.  ३ पैठणी २ सोन्याची नथ व सोफा बुकिंग वर भरघोस सवलत तसेच, इतर भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कार्यक्रम संपल्या नंतर आलेल्या पाहुण्यांन साठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. असे वंदन फर्निचर शोरुमचे मालक सचिन उत्तेकर बांदल पाटील यांनी सांगितले.

सुकलवाडीत विद्यार्थ्यांकडून ग्राम सर्व्हेक्षण

वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ हडपसर येथील आण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सुकलवाडी (ता.पुरंदर ) येथे एक दिवशीय ग्राम सर्वेक्षण शिबिर राबविण्यात आले. या शिबिराचा शुभारंभ विद्यालयाचे प्राचार्य नितीन घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये मराठवाडा येथील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण गावामध्ये प्रभातफेरी काढत पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी निधी संकलन करण्यात आला. तसेच गावच्या शेतातील माती परीक्षण तसेच ग्रामस्थांसह शेतकऱ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांनी शेतीविषयी माहिती देखील घेतली.तसेच येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले . यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव एल.एम.पवार डॉ.संगीता साळवे डॉ.विलासजी आढाव सविता कुलकर्णी  प्रा.ऋषिकेश मोरे प्रा.नरसिंह पावडे, प्रा.अपूर्वा बनकर सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार उपसरपंच नितीन गावडे यांसह धनंजय पवार राहुल यादव साईनाथ चव्हाण ह.भ.प.माणिक महाराज पवार  नारायण पवार मनोज घाटे अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन घराणे जोडताना जपला सामाजिक कार्याचा वारसा

इंदापूर:- प्रा भास्कर गटकुळ(इंदापूर) यांचे सुपुत्र चि पृथ्वीराज आणि कमलाकर गायकवाड पाटील (उमरगा) यांची कन्या अनघा गायकवाड पाटील यांचे लग्न जमविताना  सुपारीच्या झाडाचे रोप भेट देऊन सुपारी फोडण्याचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी श्री व्यंकटराव गायकवाड पाटील,सेवानिवृत मुख्य सचिव,जलसंपदा महाराष्ट्र राज्य,भाजपचे माजी खासदार,प्रा. रवींद्र गायकवाड पाटील, प्रा विलासराव कदम,शिवाजीराव पाटील,अँड मनोहर चौधरी, अरविंदतात्या वाघ, डॉ महेश जगताप, सूर्यकांत भोरे, अंकुश पाडुळे,ॲड. जालिंदर बसाळे, नितीन पटेल,शिवाजी कापसे,यशवंत शितोळे, सीताराम जाधव, प्रा रविराज थोरात, अश्विनी थोरात, पंडित नलवडे, युवाउदयोजक अभिजित चव्हाण, पुणे रोटरी क्लब अध्यक्ष गोविंद जगदाळे, प्रा चंद्रशेखर लावंड मान्यवर उपस्थित होते.  सुपारी फोडण्याचा कार्यक्रम हा वधू आणि वर यांच्या दोन घराण्याचा नाते जोडणारा कार्यक्रम असून दोन घराण्यातील नात्याची ओळख आणि प्रेम वृद्धींगत होते अशा कार्यक्रमात प्रा. भास्कर गटकुळ आणि प्रा.जयश्री गटकुळ यांनी सर्व नातेवाईकांना पर्यावरण जागृतीसाठी सुपारी झाडाची रोप भेट म्हण...