इंदापूर, डॉ. संदेश शहा. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघ, आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान, समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा ट्रस्ट तसेच सकल जैन समाजाच्या वतीने इंदापूर येथील सुश्रुत हॉस्पिटल मध्ये आयोजित मोफत होमिओपॅथिक शिबीराचा लाभ १२१ वारकरी रुग्णांनी घेतला. उपक्रमाचे हे बत्तीसावे वर्ष आहे. मोफत होमिओपॅथिक औषधोपचार शिबीराचे उद्घाटन कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी केले. यावेळी भरत शहा म्हणाले, सध्या आधुनिक चिकित्सा, भारतीय आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, युनानी औषधोपचार पद्धतीस जनमान्यता आहे. मात्र पालखी वारकऱ्यांना फक्त आधुनिक चिकित्सा पद्धतीव्दारे उपचार करण्यात येतात. काहींना त्याचे दुष्परिणाम जाणवतात. त्यामुळे त्यांच्यावर सुरक्षित उपचार करण्यासाठी होमिओपॅथिक उपाययोजना पालखी सोहळ्यात करणे गरजेचे आहे. यावेळी बाळासाहेब मोरे, पोपटराव पवार, शकील सय्यद, प्रमोद राऊत, आरशाद सय्यद, सुनील तळेकर, अशोक चव्हाण, श्री. माने हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. संदेश शहा, डॉ...
SHIVSRUSTHI NEWS