१० वी,१२वी बोर्ड परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये आयोजन
इंदापूर:- जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचालित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी मध्ये दिनांक 16 मे 2025 रोजी इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. त्यासाठी इंदापूर तालुक्यातील 63 शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . प्रत्येक विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक आलेल्या एकूण 189 विद्यार्थ्यांचा, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. विद्येची आराध्य देवता सरस्वती पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील कु.ज्ञानेश्वरी नाथाजी मोहिते व कु.मृण्मयी अतुल शिंदे दोन विद्यार्थिनींनी तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला तसेच कु.ज्ञानेश्वरी नाथाजी मोहिते हिने गणित या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला, त्याबद्दल संस्थेच्या वतीने तिचे व इंदापूर तालुक्यातील यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करण्यात आले. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा...