*इंदापूर*: (दि.१३)- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल शेकडा गुण १०० % टक्के लागला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
पहिले तीन मानकरी
पहिली: गायकवाड मानसी संजीव ( ८४.४० टक्के),दुसरी : मिटकल दिक्षा सिताराम (८१.६० टक्के), तिसरी : जाधव शुभांगी सुभाष (८१.४० टक्के).
संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड. समीर मखरे यांनी वरील तीन मानकऱ्यांसह उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी , त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व प्राचार्या अनिता साळवे यांचे अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या