भारतीय निर्यातक्षम ज्वारीला ग्लोबल करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील : अमेरिका सोरघम युनायटेड फाउंडेशनचे सीईओ नेट ब्लूम यांचे शेतकऱ्यांना आश्वासन.
इंदापूर, डॉ. संदेश शहा. शेतकरी हा जगाचा अन्नदाता बळीराजा आहे. त्यामुळे शेतकरी सुखी तरच जग सुखी रहाणार आहे. भारतीय आहारात आरोग्यदायी ज्वारीला खूप महत्व आहे. त्यामुळे ज्वारीचे दैनंदिन आहारातील महत्व लक्षात घेऊन निर्यातक्षम भारतीय ज्वारीला ग्लोबल करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही अमेरिके तील सोरघम युनायटेड फाउंडेशनचे सीईओ नेट ब्लूम यांनी दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सोरगम युनायटेड फाउंडेशन, समृद्धी ऍग्रो ग्रुप आणि कृषी विभाग यांच्या कडून ज्वारीला ग्लोबल करण्याचे नियोजन करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील रामवाडी - वडापुरी येथे आयोजित एक दिवसीय मोफत कार्यशाळेत नेट ब्लूम बोलत होते. कार्य शाळेत तालुक्यातील पाच गावातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. नेट ब्लूम पुढे म्हणाले, भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात असून देशात शेती व्यवसायास अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जे पिकते, त्यापेक्षा बाजारपेठेत जे विकते ते पिकविण्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे स्थानिक भारतीय ज्वारीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लो...