(नितीन क्षीरसागर यांच्या कडुन)
इंदापूर तालुक्यातील कालठण क्रमांक एक येथील एकुण 43 भाविकांनी दोन दिवशीय काळात देवगड नेवासा शनिशिंगणापूर शिर्डी त्रिंबकेश्वर ब्रह्मगिरी टेकडी प्रदक्षिणा पंचवटी रेणुका माता सोनई गजानन महाराज अध्यात्मिक सेवा केंद्र त्रिंबकेश्वर येथे दोन दिवशीय काळात धार्मिक दर्शन घेतले.
जागतिक महिला दिनानिमित्त व सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन करण्यात आले होते.दोन दिवशीय काळात 43 भाविकांपैकी 20भावीकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली यात प्रामुख्याने नितीन क्षीरसागर . अर्जुन कुंभार.केरबा जावळे.बाळासो जगताप.निखील पवार.. चंद्रकला लोंढे.अलका खबाले.विमल जावळे. राणि क्षीरसागर कमल पाडुळे.वैशाली मदने.अनीता मदने यांच्यासह एकूण 20 भाविकांनी चार तासात सात किलोमीटर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा टेकडी पूर्ण केली. या ठिकाणी गोदावरी नदी संगम.शिवजटा म़ंदीर . ब्रम्हगिरी मुख्य दर्शन . आदी पहावयास मिळाले .पंचवटी मध्ये काळाराम मंदिर सीता हरण. शुर्पणका दृश्य. काळाराम मंदिर.70फुट राम मुर्ती.आदी ठिकाणे पाहिली.
शिर्डी त्रिंबकेश्वर येथे आरती महाप्रसादाचा लाभ घेतला.
धार्मिक यात्रेचे आयोजन लक्ष्मी शिंदे.वनीता शिंदे पाटील. संगीता बनसोडे. छाया करे.सिंधु बनसोडे.मालन करे . राणी कुंभार आदींनी केले. तीर्थक्षेत्र यात्रेसाठी आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी सहायक वाहतूक अधीक्षक संजय वायदंडे दत्तात्रेय भोसले वाहतूक नियंत्रक श्रीचंदनशिवे. शिगांडे. कोरटकर.यांनी विशेष सहकार्य केले.देवदर्शनकामी चालक श्री विवेक पोरे नंदकुमार दळवी यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या