*ज्येष्ठ कवियत्री गुरुवर्य श्रीमती प्रतिभाताई गारटकर यांच्या ९० व्या वाढदिवसा निमित्त शाळेतील ३५० मुलांना पुस्तके व खाऊ वाटप*
इंदापूर:- ज्या जि प .शाळेत पहिलीचे शिक्षण घेतले त्याच शाळेत जाऊन पुन्हा ९० व्या वर्षी मुलांचा वर्ग घेऊन आपला ९० वा वाढदिवस मुलांना पुस्तके, व खाऊचे वाटप करून शाळेतील मुलांसोबत साजरा केला ज्येष्ठ कवियत्री,श्रीमती प्रतिभा गारटकर या शाळा क्रमांक २ च्या माजी विद्यार्थीनी होत तेथेच त्यांनी अ - आ - इ . ई शिकल्या पुढे त्याच शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणूनही काम पाहिले .आज त्याच्या ९० व्या वाढदिवसानिमित्र त्याच शाळेत जाऊन आपल्या ज्युन्या आठवणी मुलांना सांगितल्या . जि .प . शाळा क्र १ व २ शाळेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद गारटकर तर प्रमुख पाहूणे म्हणून केंद्र प्रमूख सि ना . चव्हाण हे होते .
प्रास्ताविक प्रा.कृष्णा ताटे यांनी केले .यावेळी शाळा नं १ च्या मुख्याध्यापिका सौ . मंदाकिनी बोराटे व शाळा नं . २च्या मुख्याध्यापिका सौ .जाई कोळेकर सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार, लेखक महादेव चव्हाण सर, संतोष जामदार, अशोक ननवरे, रघुनाथ खरवडे,धरमचंद लोढा .सचिन चौगुले शिक्षिका रजिया शेख , भारती पौळकर, मनिषा मोटे, ज्योती पवार, वैशाली वर्तले, पुष्पा दळवी, श्री कृष्णा शिंदे, दत्तात्रय वारे, इ . उपस्थित होते . सुत्रसंचालन विनय मखरे यांनी केले,तर आभार कोळेकर यांनी मानले .
टिप्पण्या