इंदापूर :- जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 13 मार्च 2025 रोजी होळी सण साजरा करण्यात आला.
होळी सणाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये एका अनोख्या, नाविन्यपूर्ण उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते, आज समाजामध्ये लहानापासून ते अबालवृद्धापर्यंत मोबाईल वापरला जातो, मोबाईल सर्वांचीच अत्यंत गरजेची वस्तू बनली आहे समाजामध्ये असे चित्र दिसत आहे की सर्वच जण मोबाईलच्या आहारी जात आहेत आणि मोबाईल व्यसनाधीन होत आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून जास्तीत जास्त दूर राहावे व आपल्या आरोग्याला घातक असणाऱ्या मोबाईलचे दुष्परिणाम काय आहेत हे समजून घ्यावेत म्हणून आज होली या सणानिमित्त प्रशालेच्या आवारामध्ये होलिका दहन करण्यात आले त्यामध्ये मोबाईल विषयी असणारे विविध ॲप्स कसे घातक आहेत हे विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले . तसेच सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घेतली की,
वाईट आहे ते जाळूया, चांगले आहे ते जपूया. आणि आयुष्याचा रंगमंच आनंदाने रंगवूया, त्याप्रमाणे सर्वांचेच वाईट विचार, दुःख, तणाव जळून जावेत आणि नवीन ऊर्जा सकारात्मकता, आणि समृद्धीचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यात उतरावा म्हणूनच होलिका दहन प्रशालेच्या आवारात करण्यात आले.
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.गणेश पवार , प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, सर्व विभागाचे सुपरवायझर यांच्या हस्ते होलीकापूजन व होलिका दहन करण्यात आले.
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, आळस यांचे दहन होवो व सर्वांना सुख, समृद्धी लाभो अशा मंगलमय शुभेच्छा संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष मा.श्री.श्रीमंत ढोले यांनी दिल्या. तसेच होळी सणानिमित्त पाणी जपून वापरा, केमिकल युक्त रंगापासून लांब रहा असा मोलाचा सल्ला संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. चित्रलेखा ढोले यांनी दिला.
संस्थेचे मुख्य सल्लागार माननीय श्री. प्रदीप गुरव साहेब तसेच सचिव श्री. हर्षवर्धन खाडे यांनीही सर्वांना होळीच्या रंगमय शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री.राजेंद्र सरगर, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य सम्राट खेडकर तसेच सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पण्या