मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*शिवाजीनगर, इंदापूर येथील सागर गोविंद पिसे यांची महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक अभियंता पदी निवड.*

इंदापूर:- IBPS द्वारे घेतल्या जाणाऱ्या सहाय्यक अभियंता महापारेषण (ऊर्जा विभाग) पदासाठीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या व रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी याचा निकाल जाहीर झाला. यामध्ये शिवाजीनगर इंदापूर येथील सागर गोविंद पिसे यांनी बाजी मारली आहे.  अगदी गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या सागर गोविंद पिसे यांचे प्राथमिक शिक्षण बेडशिंगे तर विद्यालयीन शिक्षण श्री हनुमान विद्यालय अवसरी तसेच शंभू महादेव विद्यालय दगडवाडी या ठिकाणी झाले असून, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण वर्धमान महाविद्यालय वालचंदनगर येथे पूर्ण करून पुढे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही पदवी इंदापूर येथील एस बी पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथून प्राप्त केली. आई-वडील गोविंद पिसे आणि अनिता पिसे यांनी मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिकवले. पदवीनंतरच्या शिक्षणानंतर सागर याने पुणे येथे अभ्यास करत स्वतःचा खर्च भागवण्यासाठी Zomato पार्सल बॉय म्हणून काम केले. दिवसभर अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून नंतर झोमॅटो चे पार्सल पुरवण्याचे काम सागर करत असे. निकाल जाही...

निमसाखर ता. इंदापूर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न.

 इंदापूर:- निमसाखर गावात सालाबादप्रमाणे शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान गावातील महिला, मुले आणि नागरिक यांच्यासाठी समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी अकलूजचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ एम के इनामदार यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी व प्रथम उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास डॉ एम के इनामदार, युवासेना सोलापूर जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, मंडल अधिकारी सतिश गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी गणेश लंबाते, कृषी सहाय्यक श्रद्धा घोडके, माजी ग्रामविकास अधिकारी सुधाकर भिलारे, कृषी सहाय्यक मार्तंड देवडे, पशुधन पर्यवेक्षक डॉ अमोल क्षीरसागर आदी मान्यवर मंडळींनी भेटी दिल्या. यावेळी गावातील नागरिकांनी उपस्थित सर्वांचा सत्का...

*इंदापूर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न'*

  इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाच्या वतीने इंदापूर महाविद्यालयामध्ये बॅ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न झाली.       राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे व उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनातून ही व्याख्यानमाला संपन्न झाली.       या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पुणे येथील स.प. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा. रूपाली अवचरे यांनी गुंफले. 'थोडे हसू आणि थोडे आसू' या विषयावरती त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या ,'आज हृदयविकाराचे वय हे पंधरा वर्षापर्यंत आलेले आहे , म्हणून सर्वांनाच हसण्याची गरज आहे. ताणतणाव मुक्त जीवन जगणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. म्हणून थोडे असू आणि थोडे हसू असेच आपले जीवन असले पाहिजे. दुसरे गुंफण्यासाठी...

*शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची इंदापूर शहरामध्ये भव्य मिरवणूक.*

*इंदापूर .२०* - येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अश्वारुढ पुतळ्याची पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष इंदापूरच्या शिवजयंतीचे प्रणेते माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रेरणेने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी नगराध्यक्ष अंकिताताई शहा, मुकुंदशेठ शहा, ॲड.राहुल मखरे यांनी जेतवन बुद्ध विहार, आंबेडकरनगर येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करत सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.  यावेळी वसंतराव साळवे, सुनील आरगडे, गोपीचंद गलांडे, विलास शिंदे,बाळासाहेब सरवदे,बाळासाहेब वाघमारे, गणेश महाजन, भास्करराव साळवे, सुहास मोरे, नितीन झेंडे, कैलास कदम,अविनाश कोतमीरे, शकीलभाई सय्यद, माऊली नाचण, लक्ष्मण वाघमोडे,रमेश शिंदे ,ॲड.किरण लोंढे, ॲड. सुरज मखरे,ॲड.आण्णासाहेब कडवळे, अक्षय मखरे, संतोष शेंडे,रवी च...

*शिवाजी महाराजांचा आदर्श युवकांनी घ्यावा - हर्षवर्धन पाटील*

बावडा येथे शिवजयंती निमित्त शोभायात्रा  हर्षवर्धन पाटलांचा शोभायात्रेत सहभाग   इंदापूर : प्रतिनिधी दि.19/2/25                    राजमाता जिजाऊं पासून प्रेरणा व संस्कार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची स्थापना केली. जीवनात संकटे आली तरी त्यावर संयमाने कशी मात करावी, हे शिवचरित्रातून शिकावे. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जीवनामध्ये यशस्वीपणे वाटचाल करावी, असे आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.         बावडा येथे शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास 395 व्या शिवजयंतीनिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.19) पुष्पहार अर्पण करून पूजा व आरती केली. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.             ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपणा सर्वांना कायम वाटचाल करावयाची आहे. छत्रपत...

छत्रपती शिवराय हे अष्टावधानी होते, ते इस्लामविरोधी नव्हते, पानिपत'कार विश्वास पाटील

इंदापूर:- छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय,' असे म्हणत आपण शिवजयंती साजरी करतो. जल्लोषी मिरवणूकही काढतो; मात्र त्यातून शिवसंदेश घरोघरी पोहोचवतो का, असा सवाल करत छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा डोळसपणे अभ्यास व्हावा, अशी अपेक्षा प्रख्यात साहित्यिक, निवृत्त सनदी अधिकारी, 'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. विधात्याने औरंगजेबसारख्या पाप्याला 89 वर्षांचे आयुष्य दिले; मात्र शिवरायांना केवळ 18 हजार 306 दिवसांचे आयुष्य दिले. परमेश्वराने आपल्या भूमीवर अन्यायच केला. मात्र, अवघ्या 49 वर्षांच्या या आयुष्यातही चार-चार शतके पुरेल इतका महापराक्रम त्यांनी केला. आणखी दहा वर्षांचे जरी आयुष्य मिळाले असते, तरी छत्रपती शिवरायांनी भीमा, निराकाठची घोडी, इंग्लंड आणि फ्रान्सच्या समुद्रकाठी नाचवली असती, असे सांगत, शिवरायांचे रूप आठवावे, प्रताप आठवावा, त्यांचे चरित्र विवेक पद्धतीने तरुणांत साठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.युगपुरुष छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा आणि जाज्वल्य इतिहास विविध प्रसंग व संदर्भांसह आपल्या खास शैलीत उलगडला. एका बखरीत शिव...

*महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्या आचार-विचारांची गरज - महारूद्र पाटील*

इंदापूर:- शिवजयंती आली की शिवरायांचा आपण जयघोष करतो मात्र केवळ आणि केवळ शिवजयंती पर्यंतच महाराजांना मर्यादित ठेवायचे आहे का याचा विचार करायला हवा. महाराजांच्या नावाचा जयघोष करणाऱ्यांचा महाराष्ट्रात सुकाळ आहे आणि त्यांच्या विचारांना कृतीत आणणार्‍या लोकांचा मात्र दुष्काळ आहे ही महाराष्ट्राची सध्याची वास्तविकता आहे.आज खरं तर महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्या आचार-विचारांची गरज आहे महाराजांनी शिकवलेल्या त्या छोट्या छोट्या मूल्यांची जपणूक करण्याची गरज आहे महाराष्ट्रातील महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे या सर्व व्यतिरिक्त महाराजांच्या आदरांजली देण्याकरिता केवळ आणि केवळ शिवजयंतीच्या चौकटीत न राहता शिवरायांची विचारसरणी आत्मसात करून ती प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहेआसे मतमराठा साम्राज्याचा इतिहास असो, महाराजांचे कार्य आणि त्यांचे शौर्य सदैव प्रेरणादायी आहे.शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. खरं तर त्यांच्या जन्मतारखेबद्दल बरेच वाद होते यावर महाराष्ट्र सरकारने तोडगा काढत 2001 ...