*इंदापूर
.२०* - येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अश्वारुढ पुतळ्याची पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष इंदापूरच्या शिवजयंतीचे प्रणेते माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रेरणेने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
.२०* - येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अश्वारुढ पुतळ्याची पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष इंदापूरच्या शिवजयंतीचे प्रणेते माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रेरणेने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगराध्यक्ष अंकिताताई शहा, मुकुंदशेठ शहा, ॲड.राहुल मखरे यांनी जेतवन बुद्ध विहार, आंबेडकरनगर येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करत सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी वसंतराव साळवे, सुनील आरगडे, गोपीचंद गलांडे, विलास शिंदे,बाळासाहेब सरवदे,बाळासाहेब वाघमारे, गणेश महाजन, भास्करराव साळवे, सुहास मोरे, नितीन झेंडे, कैलास कदम,अविनाश कोतमीरे, शकीलभाई सय्यद, माऊली नाचण, लक्ष्मण वाघमोडे,रमेश शिंदे ,ॲड.किरण लोंढे, ॲड. सुरज मखरे,ॲड.आण्णासाहेब कडवळे, अक्षय मखरे, संतोष शेंडे,रवी चव्हाण, महादेव चव्हाण सर,हमीद आतार,पत्रकार धनंजय कळमकर,(शैलेश काटे, सह परीवार )महेश स्वामी,सिद्धार्थ मखरे, शिवाजी शिंदे, अश्वजीत कांबळे, संजय कांबळे, शकुंतला मखरे (काकी), सायराभाभी आतार आदी मान्यवर उपस्थित होते.
मिरवणूक नगरपालिका मैदानात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना वसंतराव साळवे व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वसंतराव साळवे यांनी भूषविले तर प्रास्ताविक जयंती कमिटीचे आयोजक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदपवार गट) प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते ॲड.राहुल मखरे यांनी केले. तदनंतर उपस्थित मान्यवरांचा जयंती कमिटीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.यानंतर सुप्रसिद्ध विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांचा कवितांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन जयंती कमिटीचे आयोजक ॲड. समीर मखरे, गोरख तिकोटे, साहेबराव पवार, यांनी केले. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले तर आभार नानासाहेब चव्हाण यांनी मानले.
टिप्पण्या