इंदापूर:-शिवजयंती आली की शिवरायांचा आपण जयघोष करतो मात्र केवळ आणि केवळ शिवजयंती पर्यंतच महाराजांना मर्यादित ठेवायचे आहे का याचा विचार करायला हवा. महाराजांच्या नावाचा जयघोष करणाऱ्यांचा महाराष्ट्रात सुकाळ आहे आणि त्यांच्या विचारांना कृतीत आणणार्या लोकांचा मात्र दुष्काळ आहे ही महाराष्ट्राची सध्याची वास्तविकता आहे.आज खरं तर महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्या आचार-विचारांची गरज आहे महाराजांनी शिकवलेल्या त्या छोट्या छोट्या मूल्यांची जपणूक करण्याची गरज आहे महाराष्ट्रातील महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे या सर्व व्यतिरिक्त महाराजांच्या आदरांजली देण्याकरिता केवळ आणि केवळ शिवजयंतीच्या चौकटीत न राहता शिवरायांची विचारसरणी आत्मसात करून ती प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहेआसे मतमराठा साम्राज्याचा इतिहास असो, महाराजांचे कार्य आणि त्यांचे शौर्य सदैव प्रेरणादायी आहे.शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. खरं तर त्यांच्या जन्मतारखेबद्दल बरेच वाद होते यावर महाराष्ट्र सरकारने तोडगा काढत 2001 या वर्षी 19 फेब्रुवारी ही जयंती शिवरायांची जन्मतारीख निश्चित केली आणि तेव्हापासून 19 फेब्रुवारीला शिवजयंती देशभरात उत्साहात साजरी केली जाते.आदिलशाही, निजामशाही आणि मुघल सत्ता किंवा स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने छत्रपती शिवाजी महाराजानी सामना केला आणि ते यशस्वी ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा अजरामर आहे त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रयतेच्या सुखासाठी स्वराज्याच्या स्वप्नासाठी वाहले. शेवटच्या क्षणापर्यंत ते लढले. अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. आसे मत मा.श्री.महारूद्र पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर यांनी व्यक्त केले यावेळी विकास खिलारे ,किसन जावळे, अमोलशेठ भिसे,छगन तांबिले समदभाई सय्यद सह इतर मान्यवर उपस्थित होते
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या