*सणसर येथे शनिवारी सणसर-लासुर्णे गटाचा, तर बावडा येथे रविवारी बावडा-लाखेवाडी गटाचा भाजपचा मेळावा,हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणाकडे लक्ष*
इंदापूर : प्रतिनिधी दि.7/3/24 भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सणसर येथे सणसर-लासुर्णे गटाचा शनिवारी (दि.9) सायंकाळी 6 वा., तर बावडा येथे बावडा-लाखेवाडी गटाचा रविवारी (दि.10) सायंकाळी 6 वा. भाजपचा विजय संकल्प मेळावा 2024 आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातील हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. *संकल्प 2024 संकल्प विजयाचा* या अभियानांतर्गत सणसर येथील मेळावा पालखी मैदानावरती तर बावडा येथील मेळावा श्री शिवाजी विद्यालयामध्ये संपन्न होणार आहे. लोकसभा निवडणुका आठवडाभरामध्ये जाहीर होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देशात सलग 3 ऱ्या वेळी सत्तेवर आणणेसाठी भाजप कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्नशील आहेत. भाजपचे कार्यकर्ते आगामी निवडणुकांसाठी ॲक्शन मोडवर आले आहेत. त्या दृष्टीने या मेळाव्यांच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील हे...