वाल्हे : सिकंदर नदाफ यांचे कडून
शिवलीला सांस्कृतिक कला मंचातर्फे पुण्यातील स्वाती महाडिक ( पुणेकर ) यांना महाराष्ट्र भूषण कलेचे शिलेदार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात शिवलीला सांस्कृतिक कला मंचाकडून २० वा राष्ट्रीय लोककला महोत्सव आयोजित करण्यात आला होता .या मोहत्सवात प्रसिद्ध व्यापारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोहर सारडा व रमाकांत घोडके यांच्या हस्ते कै.तुकाराम खंडू गरड ( मिरजकर ) यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा महाराष्ट्र भूषण कलेचे शिलेदार हा पुरस्कार पुण्याच्या प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी स्वाती महाडिक यांना प्रदान करण्यात आला आहे.
याप्रसंगी अभिनेत्री मोहिनी खोत यांसह सुरेश गरड रिंकल सावंत सारिका घोरपडे आयुब ऐनापुरे बाळकृष्ण देशपांडे महादेव हरके आशा फडणवीस सविता बापट कल्पना जाधव लंका पाचेगावकर रवी रेणके आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या