इंदापूर तालुक्यातील मित्र पक्षांची हर्षवर्धन पाटील यांना धमकी तरमा.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांना पत्र
इंदापुर :
- महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. आसे पत्र . मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले, आहे
सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेउन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे आसे पत्रात नमूदकरण्यात आलेआहे,
.□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□ इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी एका ग्रामीण भागातील सभेत हर्षवर्धन पाटलांना रस्त्यावर फिरू देणार नाही असे भाषणात नमूद केले होते त्याचा धागा पकडत हर्षवर्धन पाटील यांनी वरील पत्र वरिष्ठांना देण्यात आले
टिप्पण्या