मुख्य सामग्रीवर वगळा

*मामा तुम्ही आमचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला म्हणत नगरपालिका कर्मचारी यांनी आमदार भरणे यांना भरविला पेढा*

 इंदापुर:-*मामा तुम्ही आमचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला म्हणत नगरपालिका इंदापूर नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामावर कायम करण्याचा प्रश्न, मागील २५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न होता. यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्यानंतर या ६४ कर्मचाऱ्यांची कायम नियुक्ती झाली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याचे उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी अद्यादेश काढला आहे. यानंतर या नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांचे आभार मानले आहेत कर्मचाऱ्यांच्या वतीने यावेळी आमदार भरणे यांचा सत्कार देखील करण्यात आला.

यावेळी बोलताना नगरपरिषद कर्मचारी सुरेश सोनवणे म्हणाले की, गेल्या पंचवीस वर्षापासून आमचा कामगारांचा प्रश्न प्रलंबित होता, आदरणीय आमदार दत्तात्रय भरणे यांनी तो प्रश्न सुलभतेने आणि चांगल्या पद्धतीने सोडवला आहे. त्याबद्दल नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. या सोबतच आम्ही कर्मचारी तुम्हाला कायमस्वरूपी कधीही विसरणार नाही म्हणत या कर्मचाऱ्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना आनंदाचा पेढा भरवला. यावेळी नगरपरिषद मधील कर्मचारी महिला देखील उपस्थित होत्या त्यांनी देखील भरणे यांना पेढा भरवला. मला साखर आहे तरीदेखील मी पेढा खातो असं म्हणत आमदार भरणे ही यावेळी या कर्मचाऱ्यांच्या आनंदात सहभागी झाले.
यावेळी भरणे म्हणाले की, हे काम मी एकट्यानेच केले नाही इंदापूर शहरातील दोघांनीही यामध्ये सहकार्य केलं चांगला ठराव दिला त्याचा आपल्याला फायदा झाला. इंदापूर शहरातील स्थानिक पदाधिकारी लोकांनीही यामध्ये सहकार्य केले. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,भरत शहा,आज माजी नगरसेवक यांचे मोठे सहकार्य झाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांबरोबर दोन-तीन बैठका झाल्या होत्या, परंतु निर्णय होण्यास काही सकाळ गेला यादरम्यान काही लोक हयात असतील नसतील मात्र जो काही फरक आहे तो त्यांच्या कुटुंबांना मिळणार आहे.

शासनाकडून तुमची कायमस्वरूपी नियुक्ती झाली यात मी तुमच्यावर उपकार केले नाहीत मी माझं कर्तव्य पार पाडले आहे. गरीब माणसाचं काम हीच ईश्वर सेवा आहे त्यासाठी लांब जाण्याची गरज नाही. तुमचा जो निर्णय झाला त्याचा सर्वाधिक आनंद मला झाला. तुमचा सक्का मामा जसा तुमच्या सोबत आहे तसा हा मामा सर्वांच्या सोबत राहील अशी ग्वाही ही यावेळी भरणे यांनी दिली.

आजपर्यंत तुमच्या आर्थिक अडचणी झाल्या त्यावर मात करावी लागली. परंतु अडचणीतूनच मार्ग सापडतो आता प्रश्न सुटला आहे,आपली मुलं बाळ चांगली शिकवा. शहरातील लोकांना जेवढी तुम्हाला मदत करता येईल तेवढी करा चांगली सेवा करा आणि तुम्ही ते कराल असा आशावाद भरणे यांनी व्यक्त केला.

इंदापूर नगर परिषदेला 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर…
इंदापूर नगर परिषदेला रस्त्यासाठी 90 कोटी आणि गटार योजनेसाठी 60 कोटी असा 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आणखीही विकास केला जाईल बाजार कट्टा आणि चांगला बगीचा इंदापूर शहरात निर्माण करायचा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते