मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून,नीरा-भीमा च्या कार्यक्षेत्रातील ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी  इंदापूर:- तालुक्यातील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर नीरा-भीमा च्या कार्यक्षेत्रातील ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी  फिरता दवाखाना रणगाव परिसरातील ऊसतोड मजुरांची तपासणी करताना उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री अंकुश पांडुरंग रणमोडे ,श्री गुणवंत रामचंद्र रणमोडे ,श्री संजय रामचंद्र रणमोडे,मा.सरपंच रणगाव. श्री राहुल उत्तम रणमोडे माजी सरपंच , निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे  कर्मचारी श्री सिद्धेश्वर जाधव , केंद्राच्या डॉक्टर श्वेता शिंदे, नर्स पूजा धांदे ,तनुजा गायकवाड, वॉर्डबॉय नितेश बेटे कर, केंद्राचे प्रमुख प्रमुख श्री महादेव चव्हाण सर व संजय शेलार सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रणगाव परिसरातील सर्व टोळ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

भावी नगरसेवक वसीमभाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली प्लस पोलिओ मोहीमेचे आयोजन... इंदापूर :-शहरातील व्यंकटेश नगर प्रभाग क्र. ५ मध्ये सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहरातील सर्वाधिक प्लस पोलिओ मोहिमेचे लसीकरण लहान बालकांना करण्यात आले.वसीमभाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली व्यंकटेशनगर, राजवलीनगर, शाहूनगर, अनपट वस्ती, सातपुते वस्ती, बाब्रस मळा येथील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण मोहिमेचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामध्ये जवळपास २०० बालकांना प्लस पोलिओ लसीकरण करण्यात आले. यावेळी वसीमभाई बागवान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  पोलिओ लसीकरण झाल्यानंतर बालकांना बिस्किट पुड्यांचे खाऊ वाटप केले. यासाठी मदतनीस सेविका चारुशीला पेटकर, बानू माने, प्रीती आरडे यांनी लसीकरण वेळी मौलाचे सहकार्य केले. यावेळी साजन ढावरे, जगदीश मोहिते, गणेश पवार, हायुल बागवान, ऋषिकेश ऊतेकर, आझाद तांबोळी, हनुमंत माने, अमीर पठाण, अरबाज बागवान, सोहम मोहिते, हबीब बागवान, अशोक ऊतेकर, विजय मोरे, इक्बाल सय्यद आदी उपस्थित होते.  

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीकारक वक्तव्ये करणाऱ्या कोशीरीचा जाहीर निषेध इंदापूर:-दिनांक २७/०२/२०२२ रोजी औरंगाबाद या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी जर समर्थ रामदास नसते तर शिवाजीला कोणी विचारले नसते असे उद्गार काढले . वास्तविक पाहता सर्व इतिहास संशोधकांनी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे पुराव्यानिशी सिद्ध केलेले आहे . त्याच बरोबर औरंगाबाद खंडपीठाने रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते अशा पद्धतीचा निकाल एका प्रकरणामध्ये दिलेला आहे . तरीदेखील एका जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने न्यायालयाचा अवमान केलेला आहे . त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी . अन्यथा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र पद्धतीचे आंदोलन करण्यात येणार आशा आशयाचे निवेदन इंदापूर तहसिलदार व पोलिस स्टेशन इंदापूर  यांना देण्यात आले या निवेदनावर , आरपीआय चे नेते शिवाजीराव मखरे, प्रतिक झोळ मराठा सेवा संघकार्याध्यक्ष,,बापूसाहेब जामदार, आरपीआय तालुकाध्यक्ष संदिपा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  कै. शंकरराव पाटील तथा भाऊ यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त नीरा-भीमा कारखान्यातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी  इंदापूर:- शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या संयोगाने कै शंकरराव पाटील तथा भाऊ यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त नीरा-भीमा कारखान्यातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून औषधे दिली . दिनांक.28/2/2022 रोजी दुपारी तीन वाजता आरोग्य तपासणीला सुरुवात  झाली. त्यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक श्री सुधीर गेंगे पाटील साहेब, संचालक श्री विलास बापू वाघमोडे साहेब संचालक श्री बाबाराव देवकर साहेब,श्री.घोगरे आजिनाथ साहेब श्री कवडे साहेब,यांच्या शुभहस्ते कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीला सुरूवात झाली.51 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आज झाली. सर्वांच्या सहकार्याने निरा भिमा चे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी कारखान्यातील विविध विभागांमधील कर्मचारी वर्ग या तपासणी वेळी उपस्थित होता.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

खासदार,छ.संभाजीराजेंच्या उपोषणास तालुक्यातील सकल मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा   इंदापूर : खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आझाद मैदानात गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला सुरुवात केली आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा बांधवांनी पाठिंबा दर्शवला असून इंदापूर तालुक्यातील बहुजन समाजातील सर्व जाती धर्माच्या बांधवांनी या उपोषणास पाठिंबा दर्शवला . इंदापूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास सकल मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवून महाराष्ट्र राज्य सरकारचा जाहीर निषेध नोंदवला, यावेळी श्री . जगदाळे म्हणाले की " महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य आत्महत्या करणारे शेतकरी मराठा वर्गातील असल्याने आज मराठा समाजाची आर्थिक सामाजिक व शैक्षणिक प्रगती यांचा दर्जा खालावला असून सरकारने याकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्यावे व खासदार छ . संभाजी महाराज यांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा अत्यंत तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल . "या वेळी असंख्य समाज बांधव उपस्थित होते,              ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कर्मयोगी शंकररावजी पाटील सह.साखर कारखान्याचा 9 लाख मे. टन गाळपाचा टप्पा पूर्ण, सर्वच ऊसाचे गाळप करणार चिंताकरू नये - हर्षवर्धन पाटील इंदापूर :          महात्मा फुलेनगर (बिजवडी ) ता. इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये आज सोमवार (दि.28 फेब्रु.) अखेर 9 लाख मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण करून चालू हंगामातील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.       कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्ठपणे सुरु असून दररोज प्रतिदिनी सरासरी 8500 मे. टना हुन अधिक क्षमतेने ऊसाचे गाळप केले जात आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने चालु आहेत. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आंम्ही प्रारंभी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गटनिहाय बैठका घेऊन सकारात्मक पद्धतीने मनमोकळे पणाने संवाद साधला. सभासदांना आम्ही कारखान्यास हंगाम यशस्वी करणेस सहकार्य करणेचे आवाहन केले. ऊस पुरवठादार सभासद ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

डॉ.संतोष खामकर, यांची वैद्यकीय अधिक्षक या पदावर नियुक्त,झाल्याबद्दल मौर्य क्रांती संघ व समता सैनिक दलाच्या वतीने सन्मान इंदापूर:-तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी वरदान ठरलेला उपजिल्हारूग्णालय इंदापूर या ठिकाणी गेली अनेक वर्षे अविरत प्रमाणीक पणे सेवा करणारे, डॉ.संतोष खामकर, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे वैद्यकीय अधिक्षक या पदावर नियुक्ति,झाल्याबद्दल मौर्य क्रांती संघ व समता सैनिक दलाच्या वतीने डाॅ.खामकर यांचा सन्मानकरण्यात आला. या वेळी अध्यक्ष व विचार मंंथन ग्रुुपचे अॅडमीन प्रकाश पप्पू पवार, समता सैनिक दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ,भैय्यासाहेब शिंदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लोकजनशक्ती पार्टी,भाऊराव झेंडे अध्यक्ष अॅण्टी करप्शन शोषल कमेटी महाराष्ट्र राज्य,व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी बोलताना डॉ. खामकर म्हणाले की,इंदापूर चे हाॅस्पिटल गोरगरीबांसाठी अत्याधुनिक आसून आम्ही रेफर ही पध्दत बंदच करून गोरगरीब रू...