छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीकारक वक्तव्ये करणाऱ्या कोशीरीचा जाहीर निषेध
इंदापूर:-दिनांक २७/०२/२०२२ रोजी औरंगाबाद या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी जर समर्थ रामदास नसते तर शिवाजीला कोणी विचारले नसते असे उद्गार काढले . वास्तविक पाहता सर्व इतिहास संशोधकांनी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे पुराव्यानिशी सिद्ध केलेले आहे . त्याच बरोबर औरंगाबाद खंडपीठाने रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते अशा पद्धतीचा निकाल एका प्रकरणामध्ये दिलेला आहे . तरीदेखील एका जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने न्यायालयाचा अवमान केलेला आहे . त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी . अन्यथा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र पद्धतीचे आंदोलन करण्यात येणार आशा आशयाचे निवेदन इंदापूर तहसिलदार व पोलिस स्टेशन इंदापूर यांना देण्यात आले या निवेदनावर,आरपीआय चे नेते शिवाजीराव मखरे, प्रतिक झोळ मराठा सेवा संघकार्याध्यक्ष,,बापूसाहेब जामदार, आरपीआय तालुकाध्यक्ष
संदिपान कडवळे, मौर्य क्रांती संघाचे शहराध्यक्ष प्रकाश पवार,हमीदभाई आत्तार, अमोल मिसाळ, वसीमभाई बागवान, नितीन देशमाने, महादेव लोंढे, माऊली नाचण, आप्पासाहेब माने विजय इंगोले, संतोष क्षिरसागर, नानासाहेब चव्हाण, स्वप्नील देशमाने, हनुमंत कांबळे यांच्या सह्या आहेत,
टिप्पण्या