मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

पीपल्स रिपब्लिकन पार्टी ( कवाडे गट) चे वतीने पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमानगर जि.सोलापूर येथे रास्ता रोको करणार-संजय सोनवणे  इंदापूर : विशेष प्रतिनिधी  दि. २१ सप्टेंबर पासून कार्यकारी अभियंता उजनी, यांच्या कार्यालयासमोर सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाची प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली नाही. याच्या निषेधार्थ (दि. ३०) रोजी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमानगर जि.सोलापूर येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्ष ( कवाडे गटा) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली आहे. मौजे रांझणी (ता. माढा जि. सोलापूर ) येथील बौद्ध समाजातील १५० भूमीहीन शेतकऱ्यांच्या मूळ जमिनी ह्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे संपादित आहेत. हे शेतकरी उजनी धरणग्रस्त असून त्यांना त्या जमिनीच्या मोबदल्यात कुठलाही शासकीय मोबदला व घर,जमीन मिळाली नाही. त्या मूळ जमिनी सध्या पडीक आहेत. ती जमीन शासनाने त्याच्या उदरनिर्वाहासाठी ह्या शेतकऱ्यांना कसण्यास द्यावी. तसेच प्रशासनाकडून उजनी जलाशय पर्यटन विकास केंद्राच...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

हर्षवर्धन पाटील यांचा कर्मयोगी कारखाना निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल इंदापूर:            राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते  हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि.23) इंदापूर प्रशासकीय भवन येथे दाखल केला.             कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या चालू असून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्ती उत्पादक कालठण गट आणि ब वर्ग संस्था सभासद प्रतिनिधी या दोन्ही मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. इंदापूरचे तहसीलदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील, सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे यांनी अर्ज स्वीकारला.            यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, लालासाहेब पवार,  राजवर्धन प...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

बौद्ध समाजातील भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमीनी वहिवाटीस द्या : संजय सोनवणे. इंदापूर : महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्याकडे असलेल्या बौद्ध समाजातील भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमीनी इतर शेतकऱ्यांप्रमाणे वहिवाटीस देण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, मौजे रांझणी  ता. माढा जि. सोलापूर येथील बौद्धसमाजातील  भूमीहीन शेतकऱ्यांच्या मूळ जमिनी ह्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे संपादित आहेत. या भूमिहीन शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या १५० आहे. हे शेतकरी उजनी धरणग्रस्त असून त्यांना त्या जमिनीच्या मोबदल्यात कुठलाही शासकीय मोबदला व घर,जमीन मिळाली नाही. त्या मूळ जमिनी सध्या पडीक आहेत. ती जमीन शासनाने त्याच्या उदरनिर्वाहसाठी त्यांना कसण्यास द्यावी. त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या वहिवाटी सुरु आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून अडचण येताना दिसून येत नाही परंतु आमच्या भूमिहीन बांधवां...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी राजकीय आरक्षणापासून वंचित- हर्षवर्धन पाटील     इंदापूर:          राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज राजकीय आरक्षणापासून वंचित राहिला आहे. राज्य सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही, हे सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र भाजप ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आग्रही असून, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे बुधवारी (दि.15) केली.             इंदापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तहसीलदार श्रीकांत पाटील यांना ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राजकीय आरक्षण कायम राहावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.                   राज्य सरकारने...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

गौराई पूजन म्हणजे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान*- प्रा.डाॅ.जयश्री गटकुळ   इंदापूर: गौराई पूजन निमित्त गौराईच्या स्वरूपात जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्यामाई, मुक्ताई, फातीमाबी आणि आधुनिक काळातील कर्तृत्ववान महिला या महान नारीशक्तीचे दर्शन घडत आहे, गौराई पूजन निमित्त महान नारीशक्तीच्या कर्तुत्वाची आठवण करून देण्यासाठी पुस्तकांचे पूजन केले. आमचा परिवार हा वैचारिक -  सामाजिक परिवर्तन विचारांचा आहे आणि येणाऱ्या काळात पुस्तक हेच शस्त्र असेल, विचार व कृती म्हणजेच वैचारिक परिवर्तन..... परिवर्तन घडवायचे असेल तर स्वतःच्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे म्हणूनच आम्ही पुस्तक पुजन केले.... शिक्षणातून, वाचनातून, वैचारिक परिवर्तनातूनच आयुष्य उज्ज्वल होते. वैचारीक दृष्टीकोनाने मार्गक्रमण करीत असेल तर जीवनात सुख समृध्दी, यश लाभेल. आजच्या आधुनिक काळातील सर्व कर्तृत्ववान महिला गौरी आहेत... गौराई पूजन म्हणजे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आहे... आजच्या काळात महिला असुरक्षित आहेत... महिलांचा आदर करा.. महिलांना सन्मान द्या. महिलेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी... महिलेवर बला...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

काटी वडापुरी जिल्हा परिषद मतदार संघात १०५० लसीकरण करण्याचा शुभारंभ-अभिजीत तांबिले इंदापूर तालुक्यातील काटी- वडापुरी  जिल्हा परिषद मतदारसंघांमधील कांदलगाव  येथून कोविशील्ड लस अठरा वर्षाच्या पुढील युवकांना देण्यास सुरुवात झाली आहे यानिमित्ताने अभिजीत भैय्या तांबिले यांच्या हस्ते काटी वडापुरी जिल्हा परिषद मतदार संघातील आज  १०५० लसीकरण करण्याचा शुभारंभाची सुरुवात कांदलगाव येथून करण्यात आली यावेळी अभिजीत तांबिले , पंचायत समिती सदस्य, संजय देवकर , धनंजय नाना तांबिले भावी पंचायत समिती,सदस्य काशिनाथ ननवरे , महेंद्र पाटील , नितीन भोसले , ज्ञानदेव बाबर , समाधान राखुंडे , विजय मामा सोनवणे , दादा भांगे दत्तात्रे सरडे , नागेश पाटील , गणेश पाटील , डॉ.सुवर्णा शिंदे मॅडम , लोहार सिस्टर मॅडम , ग्रामसेविका लोंढे मॅडम उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन कांदलगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवकांनी चांगल्या पध्दतीने नियोजन केले याचे मला कौवतूक आहे. तांबिले जिल्हा परिषद मतदारसंघामधील तरुण युवक व ज्यांचे राहिलेला दुसरा लसीचा डोस घेण्यास आव्हान केले आज...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

नीरा भीमा कारखान्यावरती श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साहात इंदापूर:                   शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साही वातावरणात शुक्रवारी (दि.10) करण्यात आली.            कारखान्याच्या कार्यस्थळावर माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या कल्पनेतून श्रीगणेशाचे सुंदर असे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरामध्ये गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प्रसंगी विधिवत पूजा संचालक दत्तात्रय शिर्के यांच्या हस्ते तर आरती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी श्री गणेशाने जनतेची कोरोनाच्या संकटातून सुखरूप सुटका करावी, असे साकडे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी घातले. यावेळी उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, दादासो घोगरे, चंद्रकांत भोसले, माणिकराव खाडे, कार्यकारी संचालक डी.एन.मरकड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. _____________...