हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 1001 बेलाच्या रोपांचे वाटप इंदापूर:तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 1001 बेलाच्या रोपाचे वाटप निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयांमध्ये करण्यात आले. बेलाचा वृक्षात आरोग्यवर्धक अनेक गुण दडलेले आहेत पोट दुखी पासून ते मधुमेह समस्यांवर बेल गुणकारी आहे. अशा पचनशक्ती व स्मरणशक्ती वाढवणार्या बेल वृक्षाचे वृक्षारोपण हर्षवर्धन पाटील यांच्या जन्मदिनी प्रत्येकाने करावे या हेतूने नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना बेलाच्या रोपाचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी बेल हे देशी वृक्ष असून भारतीय परंपरेत बेलास महत्त्व आहे.आयुर्वेदात त्या...
SHIVSRUSTHI NEWS