इंदापुर:जागतिकी करणानंतरच्या या काळात एक तर नोकरी मिळवणे अवघड आणि जर दैवयोगाने मिळाली तर टिकवणे अवघड. अशा परिस्थितीमध्ये स्वत:चा
उद्योग सुरू करण्याला पर्याय नाही. आपला उद्योग-व्यवसाय लहान का असेना, पण तो आपला असतो; म्हणून तरुणांनी नोकरीचा मोह सोडून,स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वत:च्या स्वयंरोजगाराचा मार्गअंगिकारला पाहिजे,
हा मार्ग खडतर आहे.वेळोवेळी नोक-्यांमध्ये कपात होते. त्याचे कारण आपल्याला समजूही शकत नाही; पण परिणाम मात्र भोगावा लागतो.
आजच्या तरुण पिढींनी केवळ नोकरीच्या मागे न लागता कौशल्य हस्तगत करुन स्वयंरोजगार उभारावा. आणि इतरांना स्वयंरोजगारामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी.
असे मत राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी श्री अमोल हेगडे निमगाव केतकी यांनी नव्याने सुरू केलेल्या अमृततुल्य रसवंतीगृह या नवीन हॉटेल चे उद्घाटन निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी ते बोलत होते, राजवर्धन पाटील यांनी स्वतः चहा बनवला, सर्वांना पिण्यासाठी दिला. यातूनच राजवर्धन पाटील हे जनसामान्यांचे नेतृत्व व आपलेपणा दिसून येतो यावेळी गणेश शेळके, परिसरातील अनेक युवा व वृध्द कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी नवीन व्यवसायासाठी हेगडे यांना शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला आहे,
टिप्पण्या