इंदापुर: पुणे सोलापूर दौऱ्यावर असताना माजी गृहराज्यमंत्री व पुणे शहर कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी इंदापूर काँग्रेस कमिटी ला सदिच्छा भेट दिली. हॉटेल स्वामीराज येथे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेट घेण्यात आली.
यावेळी शहरात वाढता कोरोना या वर सविस्तर चर्चा झाली. तसेच हे सरकार महाविकास आघाडीचे असल्याने काँग्रेस पक्ष पुणे जिल्ह्यात बळकट करण्यासाठी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी ला सहकार्य राहील असे मत रमेश बागवे यांनी व्यक्त केले.
यावेळी शहराध्यक्ष तानाजीराव भोंग, इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे सचिव सुफीयान जमादार, संतोष अरडे व कॉग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या