राज्यपालांची हर्षवर्धन पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट
इंदापूर: पुणे येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.17) सदिच्छा भेट घेतली. राजभवनमध्ये झालेल्या या भेटीच्यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील उपस्थित होत्या.
याभेटीप्रसंगी झालेल्या चर्चेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेशी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवरती संवाद साधला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रशासनाचा व राजकारणाचा असलेला प्रदिर्घ अनुभव यावेळी त्यांच्या बोलण्यातून व संकल्पनेतून जाणवला, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
युवापिढीने राजकारणात सक्रिय होऊन जनसेवा करावी यासाठी ते आग्रही दिसले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेकडे सकारात्मक विचारांची मोठी शिदोरी असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. राज्यपाल हे प्रचंड अनुभवी व या वयातही जिद्दी असल्याचे जाणवले, त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला निश्चितपणे होईल, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
तसेच याभेटीप्रसंगी झालेल्या चर्चेमध्ये जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनीही सहभाग घेतला. राज्यपालांशी झालेल्या भेटीमुळे अधिक जिद्दीने काम करणेसाठी विचारांची नवीन ऊर्जा मिळाल्याचे अंकिता पाटील यांनी नमूद केले.
______________________________
टिप्पण्या