इंदापुर ;तालुक्यातील काही किराणा दुकान दार माजले फार यावर प्रशासन कारवाई कधी करणार .....
कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून
अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे
त्याचप्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान मा .नरेंद्र मोदी यांनी देखील २१ दिवसाचा लोक डाऊन घोषीत केलेला आहे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये तसेच जेथे आहे तेथेच थांबावे हा आपल्या कसोटीचा काळ असून यiचे तंतोतंत पालन करावे
असे अवाहन व कळकळीची विनंती देखील केली आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, पत्रकार,आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत सहज उपलब्ध करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.परंतु
ग्रामीण भागातील काही अपवाद वगळता दुकानदार किराणा मालाच्या कृत्रिम तुटवडा दाखवून
मालाच्या किमतीत भरमसाठ लूट करत असल्याचे उघडकीस येत आहे.उदाहरणार्थ: शेंगदाणे 80रू,होते 110 रू.तेलपुडा 90चा 110,साखर 36रू,ची40रू.बेसन 70रू.चे 90रू.गुळ 38रू.चे 42रू.मुगदाळ 90रू.ची 110 ..रूपयांने विकतात प्रत्येक मालाच्या नगाचे दर भरमसाठ वाढवून चढ्या भावाने विक्री केली जाते....
यावर शासनाने आवश्यक ते निर्बंध घालावेत अशी सर्वसामान्यांमधून मागणी होत आहे.
देशात सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोणीही घराबाहेर पडू नये यासाठी पोलिस प्रशासन डोळ्यात तेल घालून दिवस रात्र जागता पहारा देत आहेत. या संचार बंदी मधून जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या ख-या पण ग्रामीण भागातील किराणा दुकानदार मालाचा कृत्रिम तुटवडा दाखवून मालाच्या किमतीमध्ये सर्वसामान्यांची लूट करताना दिसत आहे अनेक वस्तूंच्या किमती वाजवी दरापेक्षा दुपटीने वाढवल्याचे आढळून
येत आहे. किरकोळ किराणा सामान खरेदीसाठी लोक दुकानात गेल्यावर जीवनावश्यक असलेल्या मालाच्या किमतीत जाणीवपूर्वक वाढकेल्याचे आढळून आले. एकतर सरकार ला सहकार्य व देश वाचविण्यासाठी जनता देखील घरातून बाहेर पडण्यासाठी उत्सुक नाही.
पण अशा जर दुकानदारांनी किंमती वाढवल्या तर लोक बेभान झाल्याशिवाय राहणार नाहीत.
येत्या काही दिवसांत जर असेच चालू राहिले तरी करोनाच्या विरोधात असलेल्या युद्धात वेगळेच प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे शासनाने किराणा व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर
ठेवण्याच्या सूचना सर्वच दुकानदारांना द्याव्यात अशी सर्वसामान्यांकडून मागणी होत आहे.
जिल्हा सीमा बंदी आसली तरी. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यास शासनाने प्रत्येक वाहनधारकास सुट दिली आहे मालाचा कृत्रिम तुटवडा भुरटे किराणा दुकानदार दाखवून ग्राहकांची लूट करत आहेत त्या मुळे जनसामान्यांचे जीवन जगणे अवघड झाले आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस झटत आहेत आणि दुसरीकडे ना-लायक अपवाद वगळता काही किराणा दुकान दार त्यांची ईज्जत घालवतात. आशा किराणा दुकान दाराची.लायसेन्स रद्द करण्यात यावे, व देशद्रोही चा गुन्हा दाखल करण्यात यावा ......
**********************************************
टिप्पण्या