इंदापूर: तालुक्यातील बावडा येथील जयहिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून करोना व्हायरसबद्दल जनजागृती
करण्यासाठी व कष्टकरी, गोरगरीब महिला भगिरनींना मोफत
मास्क वाटप करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने
ग्रामपंचायतींना करोना व्हायरस निवारणासाठी अधिकचा निधी देऊन
सर्व गावातील गोरगरीब लोकांना मोफत मास्क व सॅनीटायझर चे
वाटप केले तर, काही प्रमाणात का होईना हा संसर्ग रोखण्यासाठी
आपल्याला यश येईल. सर्वच गोष्टी सरकार करू शकत नाही,
म्हणूनच समाजातील काही संघटना, फाउंडेशन, सेवाभावी संस्था व
समाजातील दानशूर मंडळींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत
फाउंडेशनचे प्रमुख मयुरसिंह पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच
किरण पाटील, उपसरपंच नीलेश घोगरे, फाउंडेशनचे कार्यकर्ते मिलिंद
पाटील, सचिन सावंत उपस्थित होते.
---------------------------------------------------------------------
टिप्पण्या