मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*नीरा-भीमा नदीवरील नवे बॅरेजेस व संरक्षण घाटाची मागणी पूर्णत्वास जाणार * *क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती*

मुंबई, दि.10:- इंदापूर मतदार संघातील निरा व भिमा नदीवर अत्याधु‌निक यंत्रणा, सुसज्ज बॅरेजेसच्या धर्तीवर नवे बॅरेजेस व सुसज्ज संरक्षण घाट बांधण्याची मागणी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. आज मंत्रालयात आयोजित बैठकीत ही मागणी केली असून ही मागणी पूर्णत्वास जाणार आहे.आज ही बैठक मुंबई मंत्रालय येथे झाली या मागणीनंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली. नीरा व भीमा नदीवर जास्त पाणीसाठा होणाऱ्या शक्य त्या ठिकाणी बॅरेजेस बांधणीसाठी सर्वेक्षण करण्याची सूचना केली. नदीवर आवश्यकता तपासून घाट बांधण्याबाबत सूचना देत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. अहवाल सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. यावेळी जलसंपदा विभागाचे अपरमुख्य सचिव दिपक कपूर, कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता अजय गुल्हाणे, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके,दत्तात्रय घोगरे उपस्थित होते.

*अलविरा सय्यद हिने पूर्ण केला पहिला रोजा*

वालचंदनगर : वालचंदनगर मेन कॉलनी येथे राहणाऱ्या हबीब सय्यद यांची लेक अलविरा हबीब सय्यद (वय ८) या मुलीने पवित्र रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला. प्रामुख्याने ८ वर्षांपेक्षा लहान मुले, मुली रोजाचा उपवास करीत नाहीत. परंतु अलविरा ने पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो पूर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी अलविरा नवीन कपडे हार घालण्यात आले. सायंकाळी ०६ वाजुन ३६ मिनिटांनी अलविरा हबीब सय्यद वय ८ वर्ष या चिमुरडीने पवित्र रमजानचा पहिला रोजा उपवास सोडला.

*ऊस शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर क्रांतिकारक ठरेल - हर्षवर्धन पाटील*

- बारामती कृषी विज्ञान केंद्रास नीरा भीमा व कर्मयोगीचे संचालक व शेतकऱ्यांची भेट  इंदापूर :                     ऊस शेती क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाणी व खतांची बचत होऊन सुमारे 40 टक्के पर्यंत उत्पादन वाढ तसेच साखर उतारा वाढ होत असल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. त्यामुळे ऊस शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए. आय.) चा वापर क्रांतिकारक ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि. 8) काढले.             बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, शेतकरी यांचेसह भेट देऊन मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठ व बारामती अँग्रीकल्चर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेल्या ऊस शेती प्रक्षेत...

*महाआरोग्य कर्करोग निदान शिबिराचे आयोजन*

बारामती, दि . 7: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तालुका आरोग्य अधिकारी, महिला शासकीय रुग्णालय, सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालय, बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क आणि एनव्हायरोमेंट फोरम ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क येथे महाआरोग्य कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  या शिबीरात महिलांच्या स्तन कर्करोग व गर्भपिशवीच्या मुखाची तपासणी करण्यात येणार आहे. सीबीसी (हिमोग्लोबिन), एचबीए1सी (रक्तातील तीन महिन्याची साखर), टीएफटी (थायरॉईड) आणि रक्तातील कॅल्शियम तपासणी या मोफत रक्तचाचण्या करण्यात येणार आहे. तसेच छातीचा एक्सरे, क्षयरोग निदान, बोन मॅरो डेन्सिटी, इसीजी, पॅप सिमेअर, व्हीआयए, मॅमोग्रॉफी या विशेष चाचण्याही करण्यात येणार आहे. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार करण्याबाबत सल्ला देण्यात येणार आहे. या शिबीरात मेहता हॉस्पिटल आणि हिंद लॅबचे सहकार्य करणार आहे. या शिबीरात सहभागी होवून आरोग्य तपास...

*इंदापूर नगर परिषद हद्दीतील कामाची वेगवेगळी निविदा काढाव्यात सुशिक्षित बेरोजगार, इंजिनियर आहेत त्यांना कामे घेता येतील- श्री. महारुद्र पाटील कार्याध्यक्ष, इंदापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष*

इंदापूर नगर परिषदेचे तारीख नसलेले व जावक क्रमांक नसलेले चे २०२४/२५ चे पत्रान्वये आपण क्लब टेंडर रक्कम रुपये १२,५९,६३,१९५ रु कामाबाबत.. आपण तारीख व जा. क्रमांक नसलेल्या पत्रान्वये सन २०२४/२५ मध्ये रक्कम रुपये १२,५९,६३,१९५ रुपयांचे क्लब टेंडर काढले आहे.तरी शासनाच्या दिनांक २१/०९/२०१८ च्या आदेशानुसार आपणा इंदापूर परिषद हद्दीतील कामाची एकत्र निविदा काढण्यात येत नाही.तरी आपण शासनाच्या नियमाचे उल्लंघन केलेले दिसते तरी आपण जे क्लब टेंडरची नोटीस काढली आहे ती रद्द करण्यात यावी व आपण परिषद हद्दीतील कामाची वेगवेगळी निविदा काढाव्यात जेणे करून सुशिक्षित बेरोजगार, इंजिनियर आहेत त्यांना कामे घेता येतील. या स्तव आपण क्लब टेंडर काढून शासनाच्या नियमाचे उल्लंघन केले तर आपणा विरुद्ध योग्य त्या न्यायालयात दाद मागावी लागेल आसे मत श्री. महारुद्र पाटील कार्याध्यक्ष , इंदापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी निवेदनात व्यक्त केले आहे.