इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानीत वसतिगृह यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात ( दि.२६) संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संविधान उद्देशिका, तथागत गौतम बुद्ध मूर्ती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमांना संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे प्रकट वाचन कु.शुभांगी जाधव, दीक्षा कडवळे या विद्यार्थीनींनी केले. यावेळी प्रा. रेश्मा झेंडे, प्रा.जावेद शेख यांनी संविधानाची माहिती दिली. तसेच मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास प्राचार्या अनिता साळवे, अधिक्षक,शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
SHIVSRUSTHI NEWS