मुख्य सामग्रीवर वगळा

*महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे निश्चित विजयाची हॅटट्रिक करणार, इंदापूर तालुक्याचे पाण्याच्या प्रश्नासह इतर प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी कटिबध्द : अजित पवार.*

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
राज्याचे भवितव्य ठरविणाऱ्या या विधानसभा निवडणुकीत 
 महायुतीस पोषक वातावरण असल्याने महायुती पुन्हा सत्तेवर निश्चित येणार आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे लोकप्रिय कर्तबगार उमेदवार दत्तात्रय भरणे हे विजेतेपदाची निश्चित हॅटट्रिक करतील मात्र तुम्ही त्यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी करा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात झालेल्या महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या विराट प्रचार सांगता सभेत ते बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, महायुती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वाट्यास विधानसभा निवडणुकी त ५८ जागा आल्या असून आपण त्यामधील २० टक्के ओबीसी, साडे बारा टक्के एसटी, मुस्लिम समाज १० टक्के, महिलांना १० टक्के प्रतिनिधित्व देत समतेचा, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार पुढे नेत आहोत. दत्तात्रय भरणे यांनी सत्ता असो वा नसो, आपल्या आमदारकीच्या काळात दोन वर्ष कोरोना साथ सोडून केवळ तीन वर्षातच ६२६३ कोटी रुपयांची विकासकामे खेचून आणली आहेत. दत्ता मामा तसेच आपले जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह आपणास मदत करणाऱ्या सर्व विचार सरणीचे प्रतिनिधी यांचा निश्चित मानसन्मान ठेवतील. सध्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॅक यामध्ये बसायचे दिवस राहिले नसून बुलेट ट्रेन चा जमाना आहे. सध्या मुंबई, पुणे, बारामती, इंदापूर ते पंढरपूर असा बुलेट ट्रेन चा सर्व्हे सुरू आहे. राज्यातील महत्वाच्या प्रकल्पा संदर्भात जागतिक बँक, जपान तसेच केंद्र सरकारच्या निधीची गरज भासणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व सर्व सहकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. बारामती नंतर आपले इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लक्ष आहे. आगामी काळात इंदापूर तालुक्याचे सर्व पाणी प्रश्न सोडविण्या साठी प्राधान्य दिले जाणार असून उजनी पर्यटन विकसित करून युवकांना रोजगार उपलब्ध केला जाईल. उजनीचे पाणी खराब झाल्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड येथील सिव्हेज वॉटर खाली येवू नये यासाठी प्रयत्न केले जातील. लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग आणले जातील, पालखी मार्ग गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. आदरणीय शंकरराव पाटील यांनी संस्था काढून त्या चांगल्या पद्धतीने चालवल्या. मात्र त्यानंतर संस्था पूर्ण ताकतीने चालवल्या जात नाहीत. दोन्ही कारखान्यावर सभासद करून घेतले जात नाही. प्रत्येक निवडणुकीत मी या विषयावर बोलतो पण त्यामध्ये काही सुधारणा होत नाही या शेलक्या शब्दात अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करून दत्तात्रय भरणे यांना विजयी करावे असे आवाहन केले.
यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी क्रांतिकारक निर्णय घेतले. त्यामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील भीमा नदी वरची इंदापूर व करमाळा तालुक्यातील शिरसवडी ते कुगाव पूल, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची गढी तसेच सुफी संत चांदशाहवली बाबा दर्गा संवर्धन, जंक्शन येथील औद्योगिक वसाहत, लाकडी निंबोडी पाणी पुरवठा योजना, दलीत, मुस्लिम समाजापर्यंत पोहोचलेला निधी, तालुक्याच्या विकासा साठी आणलेल्या ६२०० कोटी हून जास्त निधी मुळे विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एवढे काम करून सुध्दा आपल्यावर होणाऱ्या आरोपांमुळे वाईट वाटत आहे. आपल्या दहा वर्षाच्या काळात तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आपण प्रामाणिकपणे केले आहे. तुमच्या वीस वर्षाच्या काळात ही कामे का झाली नाहीत याचा जाब तुम्ही विरोधकांना विचारणे गरजेचे आहे. आगामी काळात शेतीच्या पाण्याचा शाश्वत प्रश्न सोडविणे, नीरा व भीमा नदीत बुडीत बंधारे बांधणे, उजनी धरणात बुडीत बंधारे बांधणे, उजनीतील पाच टीएमसी पाणी शेटफळ गढे येथून तालुक्यात फिरवणे आदी कामे करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. मी कामे केली आहेत यावर तुमचा विश्वास असेल तर मला विजयी करा. मी कामे केली नसतील तर दैवत इंद्रेश्र्वर माझे वाटोळे करेल, तुम्ही खोटे बोलत असाल, लबाड वागत असाल तर मी तुमचे वाटोळे व्हावे असे म्हणणार नाही तर देव तुमचे बघून घेईल अशी उपरोधिक टीका त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली.
यावेळी प्रदीप गारटकर, आप्पासाहेब जगदाळे, संजय सोनवणे, हनुमंत कोकाटे, तानाजी थोरात, डॉ. शशिकांत तरंगे आदींची भाषणे झाली. यावेळी प्रशांत पाटील, देवराज जाधव, श्रीमंत ढोले, अभिजित तांबिले, माऊली चवरे, गजानन वाकसे, दशरथ डोंगरे, युवराज पोळ, सचिन सपकळ, बाळासाहेब सरवदे, उमाताई इंगुले, बाळासाहेब ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचलन निलेश धापटे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...