*राज्यात इंदापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुक निकालाकडे सर्वांचे लक्ष ! हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे की प्रविण माने कोण जिंकणार यासंदर्भात लागल्या पैजा !*
इंदापूर,डॉ. संदेश शहा.
इंदापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत उभे असणारे महायुतीचे उमेदवार, विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, महाविकास आघाडीचे उमेदवार तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती तथा आंतरराष्ट्रीय प्रसिध्दी प्राप्त सोनाई दूध संघ व परिवाराचे संचालक प्रविण माने यांच्यासह इतर सर्व उमेदवारांचे भवितव्य कुलूपबंद झाले
आहे. दिनांक २३ नोव्हेंबर रोजी निकाल असून या निवडणुकीत कोण विजयी होणार यावरून समर्थकांमध्ये पैजा लागल्या आहेत. राज्यात महायुतीचे किंवा महाविकास आघाडीचे सरकार येणार या चर्चेबरोबरच राज्य मंत्रीमंडळात कोणाचा समावेश होणार याची देखील चर्चा इंदापूर तालुक्यात रंगली आहे. ही निवडणूक दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी असली तरी ही निवडणूक राजकारणातील महावस्ताद शरद पवार विरुद्ध वस्ताद अजित पवार यांच्यात रंगली आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार प्रविण माने यांनी शिस्तबध्द प्रचार यंत्रणा राबवून प्रचारात प्रस्थापितांना मोठे आव्हान उभे केले. त्यामुळे दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील विजयाची हॅटट्रिक करणार की प्रविण माने विजयी चौकार मारणार याकडे राजकीय किंग मेकर यांचे लक्ष लागले आहे. राजकारणात दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील हे विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी असले तरी प्रविण माने या सूर्यकुमार यादव याने देखील लक्षवेधी कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आहे. दिनांक २३ नोव्हेंबर रोजी निकाल असून या निवडणुकीत कोण विजयी होणार यावरून समर्थकांमध्ये पैजा लागल्या आहेत. राज्यात महायुतीचे किंवा महाविकास आघाडीचे सरकार येणार या चर्चेबरोबरच राज्य मंत्रीमंडळात कोणाचा समावेश होणार याची देखील चर्चा इंदापूर तालुक्यात रंगली आहे. ही निवडणूक दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी असली तरी ही निवडणूक राजकारणातील महावस्ताद शरद पवार विरुद्ध वस्ताद अजित पवार यांच्यात रंगली आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार प्रविण माने यांनी शिस्तबध्द प्रचार यंत्रणा राबवून प्रचारात प्रस्थापितांना मोठे आव्हान उभे केले. त्यामुळे दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील विजयाची हॅटट्रिक करणार की प्रविण माने विजयी चौकार मारणार याकडे राजकीय किंग मेकर यांचे लक्ष लागले आहे. राजकारणात दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील हे विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी असले तरी प्रविण माने या सूर्यकुमार यादव याने देखील लक्षवेधी कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दत्तात्रय भरणे यांची मदार मतदार संघासाठी मंजूर केलेल्या ६२०० कोटी रुपयांच्या विकास कामाबरोबरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होती. त्याबरोबरच त्यांना रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची साथ मिळाली. ऐन निवडणुकीत जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, माजी सभापती विलासराव माने, दत्तात्रय फडतरे, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, नीरा भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक अतुल व्यवहारे, महाराष्ट्र
रिपब्लीकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवरांचे भरणे यांना सहकार्य मिळाले. त्यामुळे मराठा, धनगर, माळी, दलीत समाज भरणे यांच्याकडे वळला. बहुसंख्य नेते भरणे यांच्याकडे वळल्याने भरणे यांनी प्रचारात सुरवातीस जोरदार आघाडी घेतली मात्र राज्य मंत्रिमंडळात वीस वर्ष विविध २७ खात्यांचे मंत्रीपद भोगलेल्या परंतु सुरवातीस बॅकफूट वर गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी सर्व राजकीय अनुभव पणास लावून या निवडणुकीत हवा भरली. बहुसंख्य नेते त्यांच्यापासून दूर गेलेले असताना देखील उर्वरित सर्व कार्यकर्त्यांची मोट बांधून फिनिक्स पक्ष्या प्रमाणे भरारी घेत निवडणुकीत आपले आव्हान जोरदारपणे कायम ठेवले. भरणे यांच्याकडे माळी समाजाचे अनेक नेते गेल्याने त्यांनी कौशल्या ने बहुसंख्य मराठा मते आपल्याकडे वळवली. जेष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, स्टार प्रचारक खासदार अमोल कोल्हे, शरयूताई पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, सागर मिसाळ आदींनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी प्रचाराचे रान उठविले. एकीकडे चुलत भाऊ तथा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह
पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडली असताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विधीज्ञ राहुल मखरे, आपला मेंबर ग्रुप चे अनिल पवार यांच्या पक्षप्रवेशामुळे बळ मिळाले. हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यामुळे बहुसंख्य मुस्लिम,दलीत मते आपल्याकडे वळविण्यात त्यांना यश आले. त्यातच शरद पवार म्हणजे शेतकऱ्यांचे दैवत आहे. त्यामुळे त्यांना मानणारे मतदार देखील हर्षवर्धन पाटील यांच्याकडे वळल्याने हर्षवर्धन पाटील यांचे पारडे निवडणुकीच्या अंतिम फेरीत जड झाले !
अपक्ष उमेदवार प्रविण माने यांची कोरी पाटी असताना देखील त्यांनी राबवलेली नियोजनबध्द प्रचार यंत्रणा हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. त्यांचा स्टॅम्प पेपरवर लेखी जनतेचा सेवक म्हणून दिलेला वचननामा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, सीईओ विष्णूकुमार माने, हरणेश्र्वर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब चवरे, मयूर सिंह पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मनोहर ढुके, राजेश जामदार, बापू जामदार, अमोल मुळे, दादा थोरात, आझाद मुलाणी आदी हातावर मोजता येणारे जुने व नवीन नेते प्रविण माने यांच्याकडे होते. मात्र त्यांनी आपला तोल ढळू न देता तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रचारात भर दिला. ज्याप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही आर्थिक न्याय दिला, त्याप्रमाणेच आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील नवीन कारखाना काढून न्याय देवू ही त्यांची भूमिका अनेक शेतकऱ्यांना पटली. त्यामुळे उपरोक्त दोन्ही उमेदवारांच्या कारभारावर नाराज असलेल्या शेतकऱ्यांनी प्रविण माने यांना साथ दिल्याने त्यांचे राजकीय भवितव्य उज्वल आहे !
या प्रमुख उमेदवारा व्यतिरिक्त मनसेचे अमोल देवकाते, रासप चे तानाजी शिंगाडे, आकाश पवार यांना किती मते मिळतील यावर प्रमुख उमेदवारां च्या विजयाचे गणित अवलंबून आहे. लोकसभेला आप्पासाहेब जगदाळे, भरतशेठ शहा हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाजूस होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विधीज्ञ तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, जेष्ठ नेते अशोक घोगरे, विधीज्ञ आशुतोष भोसले, डॉ. रियाज पठाण यांनी खिंड लढवून सुप्रिया सुळे यांना २६ हजार मताधिक्य मिळवून दिले. नेमकी तीच स्थिती विधानसभा निवडणुकीत दिसून आली. बहुसंख्य प्रमुख नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यपद्धतीवर कंटाळून त्यांच्यापासून दूर गेले असले तरी शरद पवार, स्वर्गीय शंकरराव पाटील व राजेंद्रकुमार घोलप यांना मानणारे मतदार, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांची अनमोल मदत हर्षवर्धन पाटील यांना झाली. तरी देखील हर्षवर्धन पाटील यांनी आपली कार्यपद्धती बदलावी हा धडा त्यांना या निवडणुकीच्या निमित्त जरूर मिळाला आहे. लाडकी बहीण योजना व विविध विकास कामे भरणे यांना तारणार की सर्वसामान्य जनता हर्षवर्धन पाटील किंवा प्रविण माने या पैकी एकाला निवडून देणार हे निवडणूक निकालानंतर कळणार आहे. मात्र लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नेते कुठल्याही पक्षात गेले तरी जनता ही खरोखर श्रेष्ठ असल्याचे सिध्द झाले असल्याने तालुक्यातील लोकशाही प्रगल्भ होत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे जो उमेदवार निवडून येईल, त्याला तालुक्या तील शेतीसाठी शाश्वत पाणी, रोजगार निर्मिती, शेतीपूरक प्रक्रिया उद्योग, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा आदी प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
टिप्पण्या