वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ
पुरंदर तालुक्यात राजकीय चळवळीचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्हे गाव भागात विधानसभेच्या निवडणूकीसाठी एकूण ८ हजार ९३६ पैकी ६ हजार ९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ६८ % चुरशीचे मतदान झाले आहे
यावेळी वाल्हे गावठाण येथील केंद्र्क्रमांक ३७१ मधून ११६६ पैकी ७५८ केंद्रक्रमांक ३७२ मधून ८७९ पैकी ५५४ केंद्र्क्रमांक ३७३ मधून ८५४ पैकी ५०३ तर केंद्र्क्रमांक ३७४ मधून १२१३पैकी ७७०जणांनी मतदानाचा हक्क बजावला ,यासह कामठवाडी येथे ९४७ पैकी ६३० तर अंबाजीचीवाडी येथे ७२१ पैकी ५३८,वागदरवाडीत ६४२पैकी ४२४ , मोरुजीचीवाडी ८०० पैकी ५८० तर आडाचीवाडी येथे ९६४ पैकी ७२८ तसेच सुकलवाडी येथे ७५० पैकी ६१० मतदारराजांनी आपले मत इव्हिएम यंत्रात बंद केल्याने सरासरी ६८ % मतदान झाले आहे .
यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक शिवाजी काटे हवालदार संदीप पवार लक्ष्मण करडे प्रशांत जाधव सुनील जाधव आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
टिप्पण्या