*माझा प्रवीण जनसेवे साठी तुमच्या स्वाधीन केला आहे, त्याचा सांभाळ करा - दशरथ माने. सांगता सभेत प्रविण माने यांनी स्टॅम्प पेपरवर लिहिलेला वचननामा दाखवून दिली तालुक्याच्या विकासाची खात्री !*
प्रवीणभैय्या हा जाती पातीचे राजकारणाला थारा न देता सर्वधर्म समभाव केंद्रस्थानी मानून काम करणारा नेता असून गरिबांच्या उपयोगी पडणारा, संकटकाळात धावून जाणारा कर्तबगार युवक आहे. तो माझा पोरगा असून तो तुमच्या स्वाधीन करतोय, त्याचा सांभाळ करायची जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे. सणसर येथील सभेत आमचे दैवत शरद पवार यांनी प्रविण भैय्या याचे नाव देखील न घेता ऊसाला कमी दर देणाऱ्या कारखानदारांना पाडा असा संदेश दिला आहे. त्यामुळे समजने वालो को इशारा काफी है असे म्हणत सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांनी प्रविण माने यास विजयी करून विधानसभेत पाठवा, तालुक्याचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सूतोवाच केले! परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण माने यांना मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांनी केले.
दशरथ माने पुढे म्हणाले, प्रवीण ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारा पोरगा आहे. त्याने कोरोनाच्या काळामध्ये गोरगरिबांच्या घरांमध्ये २५ हजार धान्याचे किट हाताने भरून दिले आहे. व्हेंटिलेटर, रेमडिसिवीर स्वःखर्चांनी देऊन अनेक रुग्णांचे जीव वाचविणारा तो देवदूत आहे. गरिबांच्या उपयोगी पडणारा असा पोरगा आहे, परंतु त्याला निवडणुकीत बाळ म्हणून त्याला
हिणवलं जातंय. पण, याच बाळाला २३ तारखेला महाराष्ट्र हुडकायला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सणसर येथील सभेत शरद पवार यांनी सोमेश्वर साखर कारखाना ३७०० रुपये, माळेगाव साखर कारखाना ३६०० दर देतो, छत्रपती कारखाना ३ हजार रुपये दर देतो, असे सांगत कमी दर देणाऱ्या कारखानदारा ला मते देऊ नका, असा इशारा दिला. त्यावेळी आपल्या नेत्याला आपल्या कारखान्याचे नाव येते की, काय म्हणून घाम फुटला होता. यामध्ये कुठे देखील प्रवीण माने यांच्याविषयी शरद पवार यांनी ब्र शब्द कधी काढला नाही. कमी दर देणाऱ्या लोकांना पाडा, असा इशारा शरद पवार यांनी दिल्याने तो 'इशारा समझनेवालो को काफी है' असे दशरथ माने म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
मी हातात माती घेतली तर तिचं सोनं करणारा माणूस आहे. एकदा काम हातात घेतलं की ते पूर्णच करतो. अनेकांना घरातून बाहेर येऊ नये म्हणून दबाव आहे. पण, सर्वजण आम्ही तुम्हाला मतदान करू, असे सांगत आहेत 'ये अंदर की बात है' असे दशरथ माने म्हणताच सभेत हशा पिकला.
यावेळी उमेदवार प्रविण माने म्हणाले, ज्याप्रमाणे आम्ही दुधाची कोंडी फोडली, त्याप्रमाणेच आम्ही ऊसाची देखील कोंडी फोडून शेतकऱ्यांना न्याय देवू. आमचे अनेक गावात बॅनर फाडले, आमच्या कार्यकर्त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या, मात्र आम्ही खालच्या पातळीवर येवून राजकारण करणार नाही तर आम्ही विकासाचे राजकारण करणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा लाईट देणार आहे तर उजनी पाणलोट क्षेत्रात पडस्थळ, गंगावळण, कुंभारगाव येथे पर्यटन विकसित करणार आहे. साखर कारखाना, टेक्सटाइल पार्क, फूड इंडस्ट्रीव्दारे हजारो युवा पिढीस नोकरी देणार आहे. जनतेचा सेवक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून आणलेला वचननामा वाचून दाखविला. हात दाखवा, आमदार थांबवा, मी व माझे कुटुंबीय कोणतेही कंत्राट घेणार नाही, आमदारकीचे मानधन गरीब मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर खर्च करणार, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज मार्गदर्शन केंद्र सुरू करणार, औद्योगिक वसाहती मध्ये युवा पिढीच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांचा ऊस गाळप व शाश्वत पाण्यासाठी टोकाचा संघर्ष करणार तसेच
भ्रष्ट्राचार झाल्यास राजकीय संन्यास घेणार ही वचने प्रविण भैय्या यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती मनोहर ढुके,बापूराव जामदार, माजी सभापती मयूरसिंह पाटील, ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे, दादा थोरात, शरद चितारे, विक्रम शेलार, उमेश घोगरे, आझाद मुलाणी, समद सय्यद, भैय्या कोकाटे, विजय भरणे, विकास खिलारे, अनिल ढावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या