ग्रामविकास कृषी जिल्हा स्तरीय कृषि व औद्योगिक प्रदर्शन २०२२ दि.23 ते 27 नोव्हेंबर,रोजी-सिमाताई कल्याणकर इंदापूर:- 10 वे ग्रामविकास कृषी प्रदर्शन इंदापूर तालुका, अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेले स्थान सधन,शेतकरी, सोलापूर, नगर, पुणे, सातारा या चारही जिल्ह्यांना जवळ असणारे, ग्रामीण व शहरी संस्कृतीची अपूर्व संगम, भरभराटीची कृषि औद्योगिक बाजारपेठ,सहकार चळवळीतून साधलेले समृद्ध औद्योगिकरण, येथील व्यवहारीक हुशार शेतकरी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन घेण्यासाठी आतुर असलेला तरुण वर्ग,राजकिय, सामाजिक जबाबदारी व कर्तव्याचे भान असलेला नागरीक ग्रामविकास कृषि या प्रदर्शनाचे स्वागत उत्सुकतेने करत आहे. सुमारे २ लाख लोकांची या प्रदर्शनास भेट अपेक्षित आहे. त्यामुळे 10 वे कृषि प्रदर्शन हे एक उत्तम व्यासपीठ मिळवून देणार यात कोणतीही शंका नाही. येथील शेतकऱ्याशी आपला थेट होणारा संवाद या निमित्ताने साधत आहोत. विकासधारा मंच ही सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक महिला सक्षमीकरण स्वयंरोजगार, व्यावसायिक,प्रशिक्षण आदी क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करीत आहे. ग्र...
SHIVSRUSTHI NEWS