शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने ‘मशाल' या नव्या चिन्हाचे इंदापूरात जल्लोषात स्वागत
इंदापूर:- शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने ‘ मशाल ' या नव्या चिन्हाचे स्वागत मंगळवारी इंदापूरात जल्लोषात केले . शहरातील अंबिका नगर येथे देवीच्या मंदिरा शेजारील असलेल्या मशालीचे पूजन करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे यांच्या जयघोषाच्या घोषणा देण्यात आल्या . यावेळी तालुकाप्रमुख नितीन शिंदे , शहर प्रमुख महादेव सोमवंशी, युवा नेतृत्व पै.अशोकराव देवकर ,देवा मगर, दुर्वेश शेवाळे ,संजय खंडाळे, वसंत आरडे, बंडू शेवाळे, व शिवसेनेचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते
.यावेळी बोलताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे म्हणाले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राज्यात ठाकरे सरकार अस्तित्वात येणार आहे , राज्यातील जनता सुज्ञ असून शिवसेनेची धगधगती मशाल हाती घेतल्याशिवाय राहणार नाहीत . जिल्हाप्रमुख महेश पासलकर व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन इंदापूर तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मशाल हे चिन्ह गावोगावी व घरोघरी पोहोचवण्याचे काम करू.
टिप्पण्या