इंदापूर :-थंडी वाढू लागली की रात्रीच्या वेळी असे मसाला दूध पिण्याची मजा काही वेगळीच आहे.थंडी पडू लागली की वेगवेगळे सूप, गरमागरम सार, मस्त अद्रक- सुंठ घातलेली कढी... असे सगळे पदार्थ गरमागरम प्यावेसे वाटतात. असाच एक थंडीत पिण्यासाठीची मस्त पदार्थ आहे बरं... तो पदार्थ म्हणजे सुकामेवा आणि केशर घातलेले वाफाळते दुध तेही देवकर बंधू चे इंदापूरात थंडी वाढू लागली की रात्रीच्या वेळी असे मसाला दूध पिण्याची मजा काही वेगळीच आहे. म्हणूनच तर इंदापूर, शहरांमध्ये थंडीच्या दिवसांत अगदी हाकेच्या अंतरावर गरमागरम मसाला दूध बनविणारे देवकर कुठूबींय....यांनी ग्राहकांची गरज ओळखून एक मसाला दूधाचा मस्तच पाॅईंट चालू केला, मसाला दूध पूर्वी कोजागिरी पौर्णिमेला मिळत असे, पण अशोक देवकर यांनी इंदापूर करांसाठी मसाला दूध चालू करून रोजच कोजागिरी साजरी केल्याचा अनुभव मिळू लागला आहे, युवकांनी नोकरीच्या मागे न लागता असे उद्योग धंदे करून आपले घर प्रपंचा सुरळीत चालवावे कामगार होण्यापेक्षा काम देणारे व्हा असा संदेश इंदापूर तालुक्यातच नव्हे संपूर्ण पुणे जिल्ह्यात नवयुवक यांना अशोक देवकर यांच्या माध्यमातून दिला आहे.मोठ्या. शहरात काही ठेल्यांभोवती केले जाणारे डेकोरेशनही खूपच भारी असते. छान चार खांब टाकून छोटासा मंडप उभा केला जातो. वेगवेगळ्या झिरमिळ्या लावून तो मंडप सजवला जातो. मंडपात मग मध्यभागी मोठी शेगडी आणि त्यावर भल्या मोठ्या काळ्या कढईत उकळत असणारे मसालेदार दूध. असं झकास वाफाळणारं दूध आता इंदापूरात देवकर दुध यांनी चालूकरून,म्हणजेच थंडी स्पेशल मसाला दुध, मसाला दूध बनविण्यासाठी दूध उकळून, दूध थोडे आटवले तर ते अधिक छान लागते. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार दूध जेवढे पाहिजे तेवढे आटवून खाव्याचा अनुभव
इंदापूरकरांना मिळतआहे. मसाला दूध पिण्यासाठी इंदापूर शहरातूनच नव्हे तर तालुक्यातील काही गावातून आबालवृद्ध मसाला दुध देवकर यांचे सध्या त्यांच्यासाठी फेमस होत आहे लाखो रुपयांची दुसर्याची फ्रांचाईस घेण्यापेक्षा स्वतःचा ब्रँड स्वतः निर्माण केला पाहिजे असे मत अशोक भाऊ देवकर यांनी लक्ष्मी वैभव न्यूज व शिवसृष्टी न्यूज ला बोलताना दिली लाखो रुपये खर्चून जनकी पंखी, उधळपट्टी न करताही उत्तम दर्जा दिला तर आपला व्यवसाय छान व जेमतेम रित्या चालू शकतो असेही अशोक भाऊ देवकर म्हणाले,
-
टिप्पण्या